सध्या महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध शिंदे म्हणजेच उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष उभा ठाकलेला दिसतोय. दोन्ही गटाचे कार्यकर्ते देखील भेटतील तिथे एकमेकांवर डोळे ताणतायेत, त्यात बुधवारी (5 ऑक्टोबर) रोजी झालेले दसरा मेळावे म्हणजे तर या संघर्षाचा लाईव्ह टेलिकास्ट होता. त्यामुळे सर्व महाराष्ट्राला सध्या शिंदे आणि ठाकरे यांचे कसे होणार याची चिंता लागलीये. मात्र, अशात दुसरीकडे ठाकरे आणि शिंदे या दोन घराण्यांची दिलजमाई झाल्याचेही दिसून आले असून सध्या याबाबत एक लग्नपत्रिका सोशलवर व्हायरल होत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे, दसरा मेळाव्याची राजकीय फटकेबाजी आणि शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना पाहायला मिळत आहे. मात्र या सर्व धामधुमीत जुन्नर तालुक्यातील एका लग्नपत्रिकेने साऱ्या राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
जुन्नर तालुक्यातील वडगावसहाणी गावचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि सरपंच तसेच निष्ठावंत शिवसैनिक श्री खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे चिंरजीव विशाल आणि आंबेगाव तालुक्यातील साल गावच्या ठाकरे परिवाराची सुकन्या चि. सौ.कां. अनुराधा यांचा शुभविवाह दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. यांच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशलवर व्हायरल झाली असून पुणे जिल्ह्यात शिंदे आणि ठाकरे घरांच्या या नव्या नातेसंबंधामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये या विषयाची जोरदार चर्चा होत आहे.
तसेच सध्याच्या राजकीय तणावाच्या वातावरणात ही लग्नपत्रिका पाहून चेहर्यावर आनंद, हसू पहायला मिळत असून चांगलीच करमणूक होत आहे, एवढं मात्र नक्की ! ( Pune Thackeray Shinde Marriage Wedding card Viral on social )
अधिक वाचा –
Photo : व्वाह.. सुंदर! वडगाव शहरात पारंपारिक शिवकालीन वेशभूषेत विजयादशमी साजरी I फोटो व्हायरल
विजयादशमी निमित्त तळेगाव दाभाडे इथे शेकडो स्वयंसेवकांच्या उपस्थितीत पथसंचलन संपन्न I RSS Talegaon Dabhade