रेल्वे मार्गावर रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने पुढाकार घेतला आहे. यानिमित्त व्हीपीएस विद्यालयात रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने (आरपीएफ) जागृती अभियान राबविण्यात आले. या दरम्यान विद्यार्थ्यांना रेल्वे सुरक्षा व कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. आरपीएफचे सहायक सुरक्षा आयुक्त टी रामचंद्रन, वरिष्ठ निरीक्षक आशिष कुमार, उपनिरीक्षक यादव, योगेश वानखडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी व्हिपीएसचे प्राचार्य उदय महिंद्रकर, उपप्राचार्य सुनीता ढिले, आदिनाथ दहिफळे, शिक्षकवर्ग होते. विद्यार्थ्यांना धावत्या ट्रेनवर दगड न मारने (स्टोन पेल्टींग), रेल्वे रूळ न ओलांडणे (ट्रेसपास), विनाकारण चेन पुलिंग न करणे, मानव तस्करी (ह्यूमन ट्रैफिकिंग) याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सध्या मोबाईलवर रिल्स बनविण्याचे फॅड आहे, त्यामुळे चालत्या लोकल व एक्स्प्रेस मध्ये स्टंट न करण्याचे आवाहन आरपीएफच्या वतीने करण्यात आले. ( railway safety lessons by RPF in VPS school Lonavala News )
रेल्वेत प्रवास करताना महिला, युवतींना काही अडचण आल्यास ‘मेरी सहेली’ उपक्रमाअंतर्गत रेल्वे सुरक्षा हेल्पलाईनचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रवाशांनी नियमांचे पालन करावे, प्रवाशांची सुरक्षा राखण्यासाठी रेल्वेतर्फे विविध योजना आखल्या जात आहेत असे आरपीएफ चे सहायक सुरक्षा आयुक्त टी रामचंद्रन यांनी सांगितले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– साळुंब्रे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन सभासदांना भाग भांडवल प्रमाणपत्र वाटप
– ‘अवजड’ बुद्धीच्या वाहन चालकांमुळे सामन्यांचे जीव धोक्यात, हाईट बॅरिकेट्स पुन्हा निकामी! MSRDC कडूनही दुर्लक्ष
– पदभार स्विकारताना सरपंचाने घेतली संविधान शपथ! मुळशी तालुक्यातील पौड गावातील घटना, राज्यात होतेय चर्चा – Video