व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, February 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नेते हो..! तुम्ही तरी कितीवेळा चिखल तुडवत येणार, रस्त्याचं मनावर घ्या अन् पुढच्यावेळी चारचाकीत बसून मत मागायला या

एकीकडे हवेतून टॅक्सी नेण्याची संकल्पना केंद्र सरकार मांडत असताना दुसरीकडे देशातील एखाद्या गावात वीज पोहोचलेली नसणे, पक्का रस्ता नसणे, पिण्याच्या पाण्याची सोय नसणे हे उधेवाडीच्या ग्रामस्थांसाठी पारतंत्र्य नाही का?

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 26, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Rajmachi-Lonavla-Maval

File Image


भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यंदा संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा झाला. हर घर तिरंग्यातही संपूर्ण देश सहभागी झाला. मावळ तालुक्याच्या टोकाला असलेले उधेवाडी गावही यात मोठ्या आनंदाने सामील झालं होतं. आपण स्वतंत्र झालो याचा 75 वा दिवस त्यांनीही साजरा केला. पण त्यांचा हा आनंद बाहेरच्या जगात कुणाला दिसला नाही. इथे बाहेरचा जग हा शब्द आम्ही जाणीवपूर्वक वापरत आहोत. ( Rajmachi Udhewadi Village Near Lonavla Deprived of Road Electricity And Water )

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. पण पुणे-मुंबई या शहराच्या मध्यावर असलेले आणि लोणावळा शहरापासून 30-40 किलोमीटर दूर असणारे मावळ तालुक्यातील दुर्गम उधेवाडी गाव अजूनही मुलभूत सोईसुविधांपासून वंचित आहे. कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल पण उधेवाडी गावातील राजमाची इथे अद्यापही वीज पोहोचलेली नाही. ना त्या गावात जायला पक्का रस्ता आहे. अतुल सावंत यांनी ही बाब दैनिक मावळच्या निदर्शनास आणून दिली.

एकीकडे हवेतून टॅक्सी नेण्याची संकल्पना केंद्र सरकार मांडत असताना दुसरीकडे देशातील एखाद्या गावात वीज पोहोचलेली नसणे, पक्का रस्ता नसणे, पिण्याच्या पाण्याची सोय नसणे हे उधेवाडीच्या ग्रामस्थांसाठी पारतंत्र्य नाही का?

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

एखादा जिल्हा भासावा असा विस्तीर्ण पसरलेला मावळ तालुका. तब्बल 103 गावं अन 2 नगरपंचायती, 2 नगरपालिका, 1 कॅन्टोन्मेंट मावळ तालुक्यात आहेत. तालुक्यात शहर, गाव, वाडी-वस्ती अशा स्वरुपात विखुरलेली जनता आहे. त्यामुळे साहजिकच प्रत्येकापर्यंत शासकीय सेवा-सुविधा पोहोचणे हे जरा कठीण कामच म्हणावे लागेल. मात्र, 75 वर्षांत एखाद्या गावाच्या वाडीवस्तीवर वीज नसणे, ना त्या गावात पक्का रस्ता असणे, ही बाब राजकारण्यांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे.

दैनिक मावळने जेव्हा राजमाची येथील स्थानिकांशी संवाद साधला तेव्हा त्यांना राजकीय प्रतिनिधींबाबत त्यांचा संताप उघडपणे व्यक्त केला. ‘मत मागायला पार चिखल तुडवत येतात हो.. पण रस्ता काय त्यांच्याच्याने होईना.. आमच्या गावात लाईटच नाही (हे सांगताना महिलेच्या चेहऱ्यावरील व्यथा स्पष्टपणे दिसत होती)… आम्ही दिवसातून एकदातरी डोंगरावर टाक्यातून पाणी आणतो प्यायला कारण अजून पाण्याचं काम व्हायचंय… फॉरेस्ट वाल्यांची अडचण आहे साहेब, नाहीतर पाण्याच्या टाकीचं झालं असतं.. आम्ही तर शेती कवाच बंद केली.. शेती करुन काय उपयोग.. राखता राखता जीव जायची वेळ येते…’

हा सामान्यांचा आक्रोश लोकप्रतिनीधी आणि प्रशासनापर्यंत कधी पोहोचणार आणि पोहोचला तरी त्यांना जाग कधी येणार, हेच आता पहावे लागेल.

अधिक वाचा –

– दैनिक मावळ विशेष । आठ हजारहून अधिक सरपंच, ग्रामसदस्यांना वक्तृत्व कौशल्याचे धडे देणारे मावळरत्न ‘विवेक गुरव’
– वडगावमध्ये आठवडे बाजाराच्या दिवशी सायंकाळी मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहनांना बंदी का घालू नये?


Previous Post

माजी विद्यार्थ्यांनी शब्द पाळला, पवना विद्या मंदिर शाळेतील सभागृह बांधणीसाठी मोठी मदतराशी शाळेकडे सुपूर्द

Next Post

‘चला.. पुढे या.. आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत भागीदार व्हा’, मुख्यमंत्री शिंदेंचे राज्यातील तरुणांना आवाहन, वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
CM-Eknath-Shinde-Twitter-Video

'चला.. पुढे या.. आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत भागीदार व्हा', मुख्यमंत्री शिंदेंचे राज्यातील तरुणांना आवाहन, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

cm Devendra Fadnavis

राज्यात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती, नव्या पद्धतीने होणार भरती ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 10, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

महाशिवरात्रीसाठी श्री भीमाशंकर मंदिर बंद राहणार ; भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकासकामे वेगात सुरू

February 10, 2026
Stopped for breakfast in Lonavala and went for a walk The only son of a famous artist died tragically

लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् फेरफटका मारायला गेला.. प्रसिद्ध कलाकाराच्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू

February 10, 2026
Nationalist Congress flag hoisted on Maval Panchayat Samiti BJPs 25 year rule overturned

मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा ; भाजपाची २५ वर्षांची सत्ता उलथवून टाकली

February 10, 2026
Free bus facility for students appearing for class 12th board exams Initiative for eight years through MLA Sunil Shelke

इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा ; आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून आठ वर्षांपासून उपक्रम

February 10, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक (मावळ तालुका) : अंतिम निकालानंतरची महत्वपूर्ण आकडेवारी, राष्ट्रवादीला आणि भाजपाला किती टक्के मतदान?

February 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.