व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दुःखद बातमी : कामशेतजवळील अपघातात गंभीर जखमी झालेल्या रत्नाकर शहा यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

मावळ तालुक्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत जवळील खिंडीत दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी एक भीषण अपघात झाला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 1, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर, शहर
Kamshet-Accident-News

Kamshet Accident


मावळ तालुक्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत जवळील खिंडीत दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रत्नाकर शहा यांचे आज (दिनांक 1 फेब्रुवारी) रोजी दुःखद निधन झाले. अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या रत्नाकर शहा यांच्यावर पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र उपचारादरम्यान शहा यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. ( Ratnakar Shah From Khopoli Raigad Died At Sancheti Hospital Pune During Treatment After An Accident Near Kamshet Maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मुळ खोपोली (काटरंग, खोपोली, जि. रायगड) येथील रहिवासी असलेले रत्नाकर शहा हे नोकरी-व्यावसायनिमित्त पुणे येथे वास्तव्यास होते. ते रविवारी (29 जानेवारी) खोपोली येथूनच पुणे येथे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत जात असताना जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कामशेतजवळ त्यांचा अपघात झाला. विरुद्ध दिशेने एक अनियंत्रित कंटेनर दुभाजक तोडून पुणे दिशेने जाणाऱ्या लेनवर शहा यांच्या कारला जोरदार धडक देऊन खोल खड्ड्यात कोसळला होता. यात शहा यांच्या कारला झालेल्या अपघातात स्वतः रत्नाकर शहा यांसमवेत त्यांच्या पत्नीला आणि लहान मुलीलाही दुखापत झाली होती. पैकी पत्नीला उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला होता. मात्र रत्नाकर शहा हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर संचेती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आजअखेर (बुधवार) सायंकाळी 5 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने खोपोलीतील शहा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अधिक वाचा –

– मोठी बातमी! कामशेतजवळ जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात – पाहा व्हिडिओ
– ‘लक्ष्मण भाऊंच्या निधनापूर्वीच भाजपकडून निवडणूकीची तयारी’, आमदार सुनिल शेळकेंच्या आरोपांमुळे खळबळ
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : करदात्यांसाठी मोठी खुशखबर, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त राहणार


dainik maval jahirat

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुका दिव्यांग सेलच्या महिला अध्यक्षपदी सारिका ढमाले

Next Post

तुंग गावात समुदाय केंद्राचे उद्धघाटन; हॅन्ड इन हॅन्ड संस्थेकडून सर्व वयोगटातील नागरिकांसाठी पुस्तके उपलब्ध

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Community-Center-in-Tung-Village

तुंग गावात समुदाय केंद्राचे उद्धघाटन; हॅन्ड इन हॅन्ड संस्थेकडून सर्व वयोगटातील नागरिकांसाठी पुस्तके उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.