व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, February 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार शेळके आणि नगराध्यक्ष ढोरे यांच्या माध्यमातून वडगावमधील केशवनगर भागातील रस्ता आणि ड्रेनेजचे काम मार्गी

खूप दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्ता, पाणी आणि बंदिस्त गटार हे विषय मार्गी लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 1, 2022
in लोकल, ग्रामीण, शहर
Vadgaon-Maval-Nagar-Panchayat

Photo Courtesy : Facebook / Mayur Prakashrao Dhore


मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान निधीतून तसेच नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नांनी वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 केशवनगर येथील रस्त्याचे आणि ड्रेनेज लाईनचे काम मार्गी लागले आहे. ( Road And Drainage Work Start In Keshavnagar Area of ​​Vadgaon )

वडगाव मावळ शहरातील प्रभाग क्रमांक 1 केशवनगर येथील, रेल्वे गेट ते किसनराव दंडेल यांचे घरापर्यंत तसेच नंदकुमार सोनवणे ते वडगाव हद्दीपर्यंत (वडगाव सांगवी मुख्य रोड ) सुमारे 1 कोटी 44 लाख रुपये खर्चून रेल्वे गेट ते वडगाव हद्दीपर्यंत मुख्य रस्ता डांबरीकरण करणे, तसेच बंदिस्त ड्रेनेज लाईन करण्याच्या कामास खापरे ओढा येथून सुरूवात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे आणि उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे यांनी सद्य स्थितीतील कामाची पाहणी केली. ( Work Start Through MLA Sunil Shelke And Mayor Mayur Dhore )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

संबधित रस्त्याचे काम साधारणतः एक ते दोन महिन्याच्या कालावधीत पूर्ण होणार असल्याने सदरील काम उत्कृष्ट दर्जाचे करण्यासंदर्भात सदर ठेकेदार सुनित कदम यांना काही महत्वाच्या सूचना देखील करण्यात आल्या. तसेच येणाऱ्या काळात केशवनगर येथील विकासकांमासाठी अजून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन नगराध्यक्षांनी या भागातील नागरिकांना दिले. ( Vadgaon Nagar Panchayat )

हेही वाचा – थेट तोडगा! आमदार शेळकेंचे सहकार्य आणि नगराध्यक्ष ढोरेंचे प्रयत्न, वडगावचा पाणी पुरवठा होणार सुरळीत

खूप दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्ता, पाणी आणि बंदिस्त गटार हे विषय मार्गी लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, बजरंग ढोरे आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते. ( Road And Drainage Work Start In Keshavnagar Area of ​​Vadgaon Nagar Panchayat Through MLA Sunil Shelke And Mayor Mayur Dhore )

अधिक वाचा –

वडगाव येथे मावळ भाजपची मासिक बैठक संपन्न, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडेंनी केले ‘हे’ महत्वाचे मार्गदर्शन
वडगावच्या जनआक्रोश रॅलीत आदित्य ठाकरेंचे तुफान भाषण! वाचा संपूर्ण भाषण जसेच्या तसे… ‘तरुणांच्या पाठीवर का वार करताय?’


Previous Post

पुणे शहर आणि जिल्ह्यात चारचाकी चोरणाऱ्या टोळीचा म्होरक्या गजाआड; मावळमध्येही केलेली चोरी

Next Post

दसरा मेळाव्याला जायचंच..! मावळ तालुक्यातून ‘सावळा’ गावचा ‘मावळा’ पायीच निघाला शिवतीर्थावर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shiv-Sainiks-Went-on-foot

दसरा मेळाव्याला जायचंच..! मावळ तालुक्यातून 'सावळा' गावचा 'मावळा' पायीच निघाला शिवतीर्थावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
girl-dies-after-drowning

इंदुरी येथे इंद्रायणी नदीपात्रात उडी मारून तरूणीची आत्म’हत्या

February 27, 2026
Strict measures to prevent accidents on highways Strict action against drunk drivers said Transport Minister

महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना ; दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई – परिवहन मंत्री

February 27, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

“वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्रा–बारवर कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करणार”

February 27, 2026
Dilip Dhore unanimously elected as group leader of Panchayat Samiti Maval in NCP meeting

Maval NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पंचायत समिती मावळच्या गटनेतेपदी दिलीप ढोरे यांची एकमताने निवड

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.