व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘भारत हा क्रिकेटचा विश्वगुरू असल्याचे संघाने सिद्ध केले’ – मुख्यमंत्री शिंदे ; महाराष्ट्र सरकारकडून विश्वविजेत्या संघाला 11 कोटींचे बक्षीस

पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणून, कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वविजेत्या भारतीय संघावर कौतुकाची उधळण केली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 6, 2024
in महाराष्ट्र, देश-विदेश
Maharashtra Government 11 crore prize to Team India

Photo Courtesy : Team Dainik Maval


भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे. हे आपल्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केले आहे. पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणून, कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वविजेत्या भारतीय संघावर कौतुकाची उधळण केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मासह, त्याचे सहकारी सुर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, प्रशिक्षक पारस म्हाब्रे, संघ व्यवस्थापक अरूण कानडे यांचा शुक्रवारी (दि. 5 जुलै) विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात विशेष सत्कार करण्यात आला. ( Rohit Sharma Suryakumar Yadav Yashasvi Jaiswal Shivam Dubey felicitated by Maharashtra Government 11 crore prize to Team India )

भारतीय संघासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने अकरा कोटी रुपयांचे विशेष पारितोषिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुंबई महानगर प्रदेशात भविष्यात भव्य आणि आधुनिक असे स्टेडियम उभारण्यास गती देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कर्णधार म्हणून रोहित यांनी संघातील सहकाऱ्यांचा जिंकलेला विश्वास हा महत्त्वाचा आहे. त्यांची नेतृत्वशैली ही भारतीय संघाच्या कर्णधाराची परंपरा राखणारी आहे. मुंबईकर हे सर्व खेळाडू महाराष्ट्राचा अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर, विधानभवनात असा दिमाखदार समारंभ होतो आहे, याचे मोठे समाधान आहे. सूर्यकुमार यांचा झेल हा अप्रतिमच होता. यापुढे रोहित टी-20 खेळणार नाही. पण यापुढे ज्या-ज्यावेळी आपण टी-20 पाहू, त्यावेळी रोहितची आठवण आल्याशिवाय राहणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

या विशेष समारंभास विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य, क्रीडाप्रेमी आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– शाब्बास ! तळेगावचा ‘श्रीरूप जगताप’ शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दुसरा, कौतूकाचा होतोय वर्षाव । Talegaon Dabhade
– अखेर प्रशासनाच्या दिरंगाईने एक बळी घेतलाच ! कार्ला-मळवली दरम्यानच्या पर्यायी पुलावरून एकजण इंद्रायणी नदीत वाहून गेला । Karla Malavli Bridge
– मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनांचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू, एकाचे पलायन । Accident on Mumbai Pune Expressway


dainik maval jahirat

Previous Post

मावळात आपत्ती व्यवस्थापनात मोलाचे कार्य करणाऱ्या ‘वन्यजीव रक्षक मावळ’ संस्थेला मोठी मदत । Talegaon Dabhade

Next Post

महत्वाचे ! ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेतील काही अटी बदलल्या, अनेक कागदपत्रांसाठी पर्याय उपलब्ध, जाणून घ्या

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

महत्वाचे ! ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेतील काही अटी बदलल्या, अनेक कागदपत्रांसाठी पर्याय उपलब्ध, जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.