पिंपरी चिंचवड शहर, मावळ तालुका तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यात आपल्या रक्तदान चळवळीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रहार रुग्णसेवक संजय गायखे यांचा जीवन हक्क परिषद आणि आदिवासी भटक्या संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ‘आदिवासी लोकमित्र‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माऊली सोनवणे यांच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे वडगाव मावळ याठिकाणी बुधवारी (दिनांक 9 ऑगस्ट) आयोजन करण्यात आले होते. ( Sanjay Gaikhe Honored with Adivasi Lok Mitra award at Vadgaon Maval )
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी चंद्रकांत सातकर, दिनकर शेटे यांच्यासह मावळ तालुक्यातील अनेक मान्यवर तथा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, नुकतेच भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले प्रसिद्ध उद्योजक रामदास काकडे यांच्या हस्ते संजय गायखे यांना ‘आदिवासी लोकमित्र’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना आयोजकांनी सांगितले की, प्रहार रुग्णसेवक संजय गायखे यांचे कार्य फक्त पिंपरी चिंचवड शहर, मावळ तालुका अथवा पुणे जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले नसून कोरोना काळात त्यांनी केलेल्या कार्याची संपूर्ण जगभरात दखल घेण्यात आली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून कोरोना काळात त्यांना प्लाझ्माच्या मदतीसाठी फोन आले. त्यांनी सर्वांना प्लाज्मा पोहचविण्याचे काम केले. या काळात हजारो गोरगरीब रुग्णांना प्लाझ्मा आणि रक्त पुरवून त्यांनी हजारो रुग्णाचे प्राण वाचविले. त्यांचा सन्मान करताना आम्हाला आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. ( Sanjay Gaikhe Honored with Adivasi Lok Mitra award at Vadgaon Maval )
माहिती आणि शब्दांकन – मंगेश सोनटक्के
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– भात उत्पादन वाढीसाठी पवनमावळात चारसूत्री पद्धतीवर प्रकल्पाचे आयोजन; कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना निविष्टा वाटप
– वडगाव नगरपंचायतवर आता ‘प्रशासक’राज, नगराध्यक्ष-नगरसेवक बनले ‘माजी’ तर सीईओ बनले ‘कारभारी’ । Vadgaon Maval
– मावळ गोळीबार घटनेची 12 वर्षे! पवनानगर इथे शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण, भाजपकडून जलवाहिनीबद्दल भुमिका स्पष्ट