व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संत तुकाराम साखर कारखाना निवडणूक : मावळ तालुक्यात 17 मतदान केंद्रे, प्रत्येक मतदाराला तीन मते देण्याचा अधिकार

साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 29 पैकी 18 जागा बिनविरोध झाल्या असून, हिंजवडी-ताथवडे या एका गटातील तीन जागांसाठी 5 एप्रिल रोजी मतदान होत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 3, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, व्हिडिओ, शहर
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या तीन जागांसाठी शनिवारी, 5 एप्रिलला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी मावळ तालुक्यात 17 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान होणार आहे, अशी माहिती सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी दिली.

साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 29 पैकी 18 जागा बिनविरोध झाल्या असून, हिंजवडी-ताथवडे या एका गटातील तीन जागांसाठी 5 एप्रिल रोजी मतदान होत आहे. कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले यांच्यासह माजी संचालक चेतन भुजबळ, दत्तात्रेय जाधव व बाळासाहेब भिंताडे असे चार जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक मुळशी तालुक्‍यातील एका गटासाठी असली, तरी कार्यक्षेत्रातील पाचही तालुक्‍यातील सभासदांना त्यासाठी मतदान करावयाचे आहे. मावळ तालुक्‍यात सुमारे सहा हजार मतदार आहेत.

  • मतदान हे मतपत्रिकेद्वारे होणार असून प्रत्येक मतदाराला तीन मते देण्याचा अधिकार आहे. मतदारांनी सोळा पैकी एक ओळखीचा पुरावा सोबत आणणे गरजेचे आहे, असे कांदळकर यांनी सांगितले आहे.

मतदान केंद्रांचे नियोजन –
तळेगाव दाभाडे (थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळा, मारुती मंदिर चौक) येथे दोन, वडगाव (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा) येथे एक, लोणावळा (डॉ. बी. एन. पुरंदरे हायस्कूल) येथे एक, कार्ला (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा) येथे एक, इंदोरी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा) येथे दोन, कामशेत (रिंकू बालवाडी, खडकाळे गावठाण) येथे दोन, सोमाटणे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा) येथे एक, उर्से (पद्मावती हायस्कूल) येथे दोन, दारूंब्रे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा) येथे दोन, चांदखेड (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा) येथे एक, कालेकॉलनी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा) येथे दोन मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मतदार संख्या –
तळेगाव दाभाडे : 754
वडगाव मावळ : 908
लोणावळा : 458
कार्ला : 117
इंदोरी : 677
कामशेत : 622
सोमाटणे : 384
उर्से : 573
दारूंब्रे: 638
चांदखेड : 432
कालेकॉलनी : 1009

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News


Previous Post

दत्तक प्रक्रियेत महाराष्ट्र देशात अव्वलस्थानी ; ५३७ बालकांना मिळाले हक्काचे ‘घर’

Next Post

पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Save this number 9850112400 Lonavala Police launches helpline number for tourists

पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.