जागतिक महिला दिनानिमित्त कुलस्वामिनी महिला मंच (मावळ) यांच्या वतीने सौ-भाग्यवती मावळ 2024 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 16 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता श्री विठ्ठल परिवार सप्ताह मैदान, कामशेत येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात गेम शो, लकी ड्रॉ, रंजक गप्पागोष्टी, हिंदी-मराठी गाणी, डान्स, हास्य विनोदातून महिलांचे मनोरंजन होणार आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
महिलांना दैनंदिन जीवनक्रमातुन थोडा विरंगुळा मिळावा व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जास्तीत जास्त महिलांनी कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजिका कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका सुनिल शेळके यांनी केले आहे. ( Sau Bhagyavati Maval 2024 program organized by Kulaswamini Mahila Manch in Kamshet )
गेम शो मधील आकर्षक बक्षिसे :
पहिला क्रमांक – टू-व्हीलर व मानाची पैठणी
दुसरा क्रमांक – रेफ्रीजरेटर व मानाची पैठणी
तिसरा क्रमांक – वॉशिंग मशिन व मानाची पैठणी
चौथा क्रमांक – LED TV (43″) व मानाची पैठणी
पाचवा क्रमांक – मोबाईल फोन व मानाची पैठणी
गेम शो मधील इतर 7 महिला स्पर्धकांना ‘खास पैठणी’ देण्यात येणार आहे.
गेम शो सादरकर्ते आहेत संदिप पाटील.
तसेच जमा झालेल्या कुपनांमधून लकी ड्रॉ काढून आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. यामध्ये पहिले बक्षीस असणार आहे – टू-व्हीतसेच लकी ड्रॉ मधील पुढील नऊ भाग्यवान विजेत्या महिलांना 5 ग्रॅम सोन्याचे नाणे मिळणार आहे. हा कार्यक्रम महिलांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.
अधिक वाचा –
– अखेर न्याय मिळालाच… तब्बल 13 वर्षांनी पवना जलवाहिनी विरोधातील आंदोलकांची निर्दोष सुटका! Pavana Closed Water Channel
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षपदी नंदकुमार कोतुळकर यांची निवड । Talegaon Dabhade
– जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद कान्हे शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन । Maval News