महाराष्ट्रातील चंद्रपूर इथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शाळेचे छत उडून गेल्याची घटना घडली आहे. गोंडपिपरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे जनजीवन विस्कळीत होत असल्याच्या घटना घडत आहे. वादळी पावसात चंद्रपूर येथील इंदिरा हायस्कूलचे छत उडून गेले. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी शाळेत कोणीही उपस्थित नव्हते. ( School roof blown off due to stormy rains in Maharashtra Chandrapur district )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सध्याचा पावसाचा अंदाज – हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा देत पुढील पाच दिवसांत वादळी वाऱ्यासह आणखी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. 25 एप्रिलसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर 26 ते 28 एप्रिल दरम्यान येलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अनेक झाडे, घरे उन्मळून पडली – सध्या झालेल्या जोरदार वारे आणि पावसामुळे या भागात मोठे नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडली, घरांची पडझड झाली, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात विजेचा धक्का लागून दोन ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर वेगवेगळ्या घटनेत गडचांदूर तालुक्यात विजेच्या धक्क्याने 36 शेळ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पवना धरणात बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अखेर यंत्रणांना यश
– ‘नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य, लोणावळा इथे परिषदेचे आयोजन’ – शालेय शिक्षण मंत्री