मावळ तालुक्यात पवना नदीच्या काठावरील गावठी दारूच्या हातभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारला. यावेळी पोलिसांना पाहताच संशयित आरोपींनी धूम ठोकली. या कारवाईत पोलिसांनी 4 लाख 81 हजारांचे साहित्य नष्ट केले. शिरगाव इथे बुधवार (दिनांक 11 ऑक्टोबर) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ही कारवाई केली. ( Shirgaon police destroyed illegal liquor den on the banks of Pavana river )
निलेश ज्ञानेश्वर पवार (वय 35, रा. शिरगाव, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार दिलीप राठोड यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर दारूभट्टी लावली असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये दारू तयार करण्यासाठी लागणारे 4 लाख 81 हजार 500 रुपये किमतीचे कच्चे रसायन नष्ट केले. पोलिस आल्याची चाहूल लागताच निलेश पवार पळून गेला, असे फिर्यादीत नमूद आहे.
अधिक वाचा –
– धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना; जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती
– मावळ तालुक्यातील विविध गावांच्या पोलिस पाटील पदांचा निकाल जाहीर; 12 गावात महिला पोलिस-पाटील, वाचा संपूर्ण यादी
– ‘पीएमपीएल’कडून वडगाव मावळ ते कात्रज थेट बससेवा बंद! प्रवाशी, नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल; बससेवा पुर्ववत करण्याची मागणी