मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रविण साहेबराव गोपाळे यांची दिनांक 1 एप्रिल, शनिवार रोजी रात्रीच्या सुमारास शिरगावातील साईबाबा मंदिरासमोरील चौकात निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण मावळ तालुक्यात खळबळ माजली होती.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मृत सरपंच प्रवीण गोपाळे हे डिसेंबर 2022 मध्ये सरपंच पदी निवडले गेले होते, तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते. त्यांच्या हत्येनंतर यांचे बंधू रवींद्र साहेबराव गोपाळे यांनी याबाबत शिरगाव परंदवडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत 4 संशयीत आरोपींना अटक केली. त्यांना रविवारी (दिनांक 2 एप्रिल) कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी वडगाव मावळ न्यायालयाने सर्व आरोपींना गुरुवार (दिनांत 6 एप्रिल) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ( Shirgaon Sarpanch Praveen Gopale murder case Arrested accused in police custody for 4 days )
प्रवीण साहेबराव गोपाळे (वय 47) अशी हत्या झालेल्या सरपंचाचे नाव आहे. तर, महेश पोपट भेगडे (वय 41, रा. तळेगाव दाभाडे), अशोक लक्ष्मण कांबळे (वय 53, रा. कांब्रे नामा ता. मावळ), मनिष देवराम ओव्हाळ (वय 42, रा. जांभूळ ता. मावळ) आणि अमोल आप्पासाहेब गोपाळे (वय 38, रा. सोमाटणे फाटा ता. मावळ) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
शिरगाव-परंदवडी पोलिस स्टेशन च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ या प्रकणाचा तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– अर्ध्या कड्यावर बॉडी आली आणि रोपचा गुंता झाला; लायन्स पॉइंट येथील बॉडी रेस्क्यूचा थरार!! शिवदुर्गच्या अथक प्रयत्नांना सलाम
– मनसे मावळ तालुका कार्ला-कुरवंडे जिल्हा परिषद गटाची नूतन कार्यकारणी जाहीर; पाहा पदाधिकाऱ्यांची संपूर्ण यादी