व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील बुधवडी गावात शिवजयंती सोहळा थाटामाटात साजरा; शिवव्याख्यानाला पंचक्रोशीतील शिवभक्तांची उपस्थिती । Shiv Jayanti 2024

मावळ तालुक्यातील बुधवडी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. Shiv Jayanti 2024 Celebrated With Eenthusiasm In Budhwadi Billage Of Maval Taluka.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 21, 2024
in लोकल, ग्रामीण
Shiv-Jayanti-2024

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील बुधवडी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. समस्थ ग्रामस्थ मंडळी बुधवडी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे जंगी नियोजन करण्यात आले होते. गावातील शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत आणि सहभागातून बुधवडी येथे सोमवारी (दि. 19) मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी झाली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

पहाटे चार वाजता किल्ले लोहगड येथून गावातील शिवभक्त तरुणांनी शिवज्योत गावात आणली. गावातील सुवासिनींनी ज्योतीचे स्वागत केले. त्यानंतर शिवज्योत आणि शिवप्रतिमेचे पूजन झाले व सामुहिक शिववंदना आणि महाआरती घेण्यात आली. यावेळी गावातील सर्व शिवभक्त नागरिक, महिला-पुरुष, बालके मोठ्या हिरहिरीने सहभागी झाले होते. त्यानंतर श्रींचा महाअभिषेक करण्यात आला. (Shiv Jayanti 2024 Celebrated With Eenthusiasm In Budhwadi Billage Of Maval Taluka)

सायंकाळी 4 चे 6 या वेळेत शिवप्रतिमेची सजवलेल्या पालखीतून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक पद्धतीने काढण्यात आलेल्या या पालखी मिरवणूकीत गावकऱ्यांचा एकोपा आणि उत्साह दिसून आला. त्यानंतर लहान मुलांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. लहानग्यांच्या कलेला उपस्थितांनी चांगली दाद दिली.

पुढे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेले पुणे जिल्ह्यातील प्रतिद्ध शिवव्याख्याते ह.भ.प. दत्तात्रय महाराज माशेरे यांचे शिवव्याख्यान झाले. शिवचरित्रातील प्रसंग ऐकताना उपस्थितांच्या अंगावर शहारे आले होते. शिवव्याख्यानासाठी पंचक्रोशीतील शिवभक्त उपस्थित झाले होते. अखेरीस महाप्रसादाने शिवजन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाले. संपूर्ण बुधवडी ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.

अधिक वाचा –
– मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा निर्णय घेतलाय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । Maratha Reservation Bill
– पवन मावळमधील शिळींब गावात शिवजयंती जल्लोषात साजरी; विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तनासाठी पंचक्रोशीतील शिवभक्तांची हजेरी
– कात्रजमधून अपहरण केलेल्या तरुणाची लोणावळ्यातून सुटका, खंडणीसाठी केले होते अपहरण । Pune News


Previous Post

मावळ तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक : अर्ज माघार घेण्यास उशीर झालेले उमेदवार मारूती असवले यांचा महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठींबा

Next Post

आमदार सुनिल शेळके यांच्या मार्फत सलग सातव्या वर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘घर ते परीक्षा केंद्र’ मोफत वाहतूक सेवा । HSC Exam 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
HSC-students-Maval

आमदार सुनिल शेळके यांच्या मार्फत सलग सातव्या वर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'घर ते परीक्षा केंद्र' मोफत वाहतूक सेवा । HSC Exam 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.