शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मावळ लोकसभा आणि मावळ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्री, मुंबई इथे पार पडली. पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहिर, शिवसेना उपनेते रविंद्रजी मिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही आढावा बैठक संपन्न झाली. ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party Maval Lok Sabha Constituency Review Meeting At Matoshree Mumbai )
शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने राज्यातील लोकसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याची चाचपणी सुरू केल्याचे दिसत आहे. त्यानुसार पक्षाकडून वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शुक्रवारी, दिनांक 18 ऑगस्ट शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी मावळ विधानसभेचाही आढावा घेण्यात आला.
सदर बैठकीला शिवसेना मावळ विधानसभा संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, तालुका संघटक यशवंत तुर्डे, तालुका संघटक शांताराम भोते, तालुका संघटक मदन शेडगे, तालुका संघटक अशोक निकम, उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभूळकर, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, उपतालुकाप्रमुख किसन तरस, तालुका सल्लागार मारूती भाऊ खोले, तालुका समन्वयक काळु हुलावळे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, देहूरोड शहरप्रमुख भरत नायडू, तळेगाव शहरप्रमुख शंकर भेगडे, उपशहरप्रमुख संजय भोईर, उपशहरप्रमुख संदिप बालघरे, युवराज सुतार युवासेना उपतालुका अधिकारी विशाल दांगट, उपतालुका अधिकारी अक्षय साबळे, सरपंच प्रकाश सावंत, सल्लागार देवा कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – काका-पुतण्याच्या भेटीने ठाकरे सावधान! पवारांविरोधात मावळात ‘पॉवर’ दाखवणार? वाचा नेमकं काय घडलंय…
मावळ मतदारसंघात 2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीन वेळा शिवसेनेचाच खासदार आहे. परंतू आता सध्याचे तिसऱ्या वेळीचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत म्हणजेच ‘खऱ्या’ शिवसेनेसोबत आहे. परंतू शिवसेनेचाच पारंपारिक मतदारसंघ असलेल्या मावळसाठी महाविकासआघाडीतील ठाकरे गट अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील तितकाच आग्रही असणार असून त्यांच्याकडून तसे उमेदवारी चेहरे पुढे येत आहेत. ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party Maval Lok Sabha Constituency Review Meeting At Matoshree Mumbai )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मंडळी! 18001208040 नंबर आताच सेव्ह करा, ‘हे’ दाखले मिळवताना अडचणी आल्यास लगेच फोन करा
– महाराष्ट्रात 31 ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धा, कशी असेल स्पर्धा? बक्षिसाची रक्कम किती? स्पर्धेचे नियम काय? जाणून घ्या सविस्तर
– आमदार शेळकेंच्या उपस्थितीत मावळ तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा वडगाव इथे संपन्न