केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Central Election Commission ) ‘शिवसेना’ नावासह पक्षाचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवलंय. या निर्णयाने राजकीय क्षेत्रात खळबळ माजलीये. आयोगाच्या सुचनेप्रमाणे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) गटाने अंधेरी निवडणूकीसाठी पक्षाच्या नावांचे आणि चिन्हांचे प्रत्येकी तीन पर्याय आयोगाकडे सोपवलेत. मात्र, शिवसेना ( Shiv Sena ) पक्षाचे नाव आणि चिन्ह न घेता शिवसेना खासकरुन उद्धव ठाकरे हे प्रथमच निवडणूकीला सामोरे जाणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही गोष्ट जिव्हारी लागणारी आणि भावनिक आहे, तरीही त्यांनी ‘जनतेला संयम बाळगायला सांगा’ असा आदेश दिला. त्यानंतर आता स्वतः उद्धव ठाकरेंनी आज (रविवार, 9 ऑक्टोबर) फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी खुप मोठे वक्तव्य केले आहे. ( Shiv Sena Uddhav Thackeray Facebook Live )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्हद्वारे संपूर्ण संबोधन….
– मी आज फेसबूक लाईव्ह द्वारे माझ्या कुटुंबीयांशी मन मोकळं करायला आलोय
– जेव्हा शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको म्हणून जे कुणी बोलले तेव्हाही मी तुमच्याशी इथूनच संवाद साधला
– माझ्या मुख्यमंत्री पदाचा त्याग पण मी इथूनच केला
– आता जरा अति होत चाललंय. या शिवसेना प्रमुख व्हायचंय.
– खोकासुरांनी शिवाजी पार्क मिळू नये म्हणून प्रयत्न केले
– उद्धव ठाकरेला काय किंमत पण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून मला किंमत. शिवसेनेचा पक्ष प्रमुख म्हणून मला किंमत.
– माझ्या आजोबांनी (प्रबोधनकार ठाकरे) यांनी शिवसेना हे पक्षाचे नाव तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना सुचवलं होतं. क्षणात सुचवलं होतं.
– तेव्हा कोण होतं सोबत, सर्व साधारण व्यक्ती होते. कारण शिवसेना ही सर्वसाधारण माणसांची भुमीपुत्रांची होती.
– पहिली सत्ता शिवसेनेची ठाण्यात आली.
– अनेकांनी शिवसेनेसाठी जीव दिलेत. तुरुंगवास भोगलेत.
– मोडेन पण वाकणार नाही या शिवसेना प्रमुखांच्या विचारांप्रमाणे शिवसैनिक चालला.
– केंद्रीय निवडणूक आयोगाने काल निर्णय दिला.
– शिवसेना नाव, पक्ष चिन्ह गोठवलं.
– 40 तोंडाच्या रावणामुळे हे झालं.
– उलट्या काळजाची ही माणसं, या माणसांमुळे शिवसेना हे पवित्र नाव गोठवलं. शिवसेनेचे धनुष्यबाण हे पवित्र नाव गोठवलं.
– यांच्या पेक्षा यांच्या पाठीच्या महाशक्तीला याचा अधिक आनंद होत आहे. कारण त्यांनी शिवसेना फोडली आणि हे केले.
– मुळात तुमचा आणि शिवसेनेच्या नावाचा संबंध काय? जे नाव माझ्या आजोबांनी दिले, वडीलांनी पुढे रुजवले, जे मी पुढे नेतोय, त्याचा आणि तुमचा संबंध काय?
– आज शिवसैनिकांच्या अश्रूत मी भिजतोय.
– यांचा उपयोग (बंडखोर) ज्या दिवशी संपेल त्या दिवशी त्यांना फेकून दिले जाईल.
– निष्ठा ही विकली जाऊ शकत नाही आणि विकत घेता येऊ शकत नाही.
– मी शिवतीर्थावर पाहिलंय, ही निष्ठा माझ्यासोबत आहे.
– जे आणीबाणीत इंदिरा गांधींनी केले, ते आता केलंय जातंय.
– काँग्रेसने कधीही शिवसेना संपवण्याचा विचार केला नव्हता, पण आता तुम्ही शिवसेना संपवण्याचा विचार करताय, मग गुन्हेगार कोण?
– आज शिवसैनिकांना त्रास दिला जातोय.
– मी डगमगणार नाही, माझ्यासोबत माझे शिवसैनिक डगमगणार नाही
– माझे आजही तुम्हाला आव्हान आहे, शिवेसेना नाव न घेता जनतेत जा.
– तुम्हाला शिवसेना हवी, शिवसेना प्रमुख हवे पण बाळासाहेबांचा मुलगा नकोय
– मला निवडणूक आयोगाचा निकाल अपेक्षित नव्हता
– अद्याप 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय प्रलंबित आहे, तेव्हा भविष्यात हा गोंधळ निस्तरणार कोण
– आपण तीन सध्या तिन चिन्हे दिलीत
– त्रिशूल, उगवता सुर्य आणि धगधगती मशाल
– तात्पुरती नावे दिलीत
– शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
– ही तीन नावे दिलीत.
– मला निवडणूक आयोगावर विश्वास आहे
– अंधेरी निवडणूकीसाठी आम्हाला या तीन नाव आणि चिन्हांपैकी एक नाव आणि चिन्ह आम्हाला लवकर द्या, कारण मला जनतेच्या दरबारात जायचं आहे
– निवडणूक आयोगाला विनंती करतो
– तुमचे आशीर्वाद, तुमचे प्रेम आणि विश्वास असाच कायम ठेवा.
शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जनतेशी संवाद – LIVE https://t.co/4SmB7Gruma
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 9, 2022
अधिक वाचा –
मोठी बातमी..! केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले, शिंदे-ठाकरे दोघांना धक्का, वाचा सविस्तर
मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विश्वनाथराव दाभाडे काळाच्या पडद्याआड