शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना त्यांच्या मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी संजय राऊत यांच्याकडून पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी पुण्यातून काहींना ताब्यातही घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ( Shiv Sena Uddhav Thackeray Group MP Sanjay Raut Death Threat Message From Lawrence Bishnoi Gang Two Persons Detained From Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शनिवारी (1 एप्रिल) सकाळी माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी, आपल्याला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे समजत आहे. ज्यानेच सलमानला धमी दिली होती, असे सांगितले. तसेच सध्या राज्यात दहशतवाद आणि दंगली सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली. यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या सुरक्षेबाबत हे सरकार गंभीर नसल्याचा आरोपही खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांना काल (गुरुवारी) रात्री त्यांच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज आला. त्यात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी आल्यानंतर संजय राऊत यांनी तात्काळ मुंबईचे पोलीस आयुक्त आणि विशेष आयुक्त यांना माहिती दिली. ‘दिल्ली में मिल तुझे एके 47 से उडा देंगे’, अशी धमकी या मेसेजमधून देण्यात आल्याचे समजते. दरम्यान, या धमकीनंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ( Shiv Sena Uddhav Thackeray Group MP Sanjay Raut Death Threat Message From Lawrence Bishnoi Gang Two Persons Detained From Pune )
अधिक वाचा –
– लायन्स पॉइंट इथे 600 फूट खोल दरीत पडून मुलाचा मृत्यू, अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात शिवदूर्ग टीमला यश
– पती कामानिमित्त गुजरातला अन् पत्नी मुलांसह माहेरी, चोरट्याने ‘हीच ती वेळ’ म्हणत घर केले साफ, उर्से गावातील घटना