श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात शुक्रवार (दिनांक 9) रोजी निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांच्या उपस्थितीत अध्यक्ष पदासह इतर पदांची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी घोरावडेश्वर अखंड हरिनाम सप्ताहाचे अध्यक्ष निलेश राक्षे, उपाध्यक्षपदी विकास कंद, समीर भेगडे, सचिवपदी अतुल राऊत, खजिनदारपदी अमित भसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
संस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे (माजी अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व संचालकांनी संस्थेच्या कामकाजात जास्तीत जास्त वेळ देऊन संस्था वाढीसाठी प्रयत्न करावेत. चांगली कर्जे देण्यात यावी याबद्दल मार्गदर्शन केले. (Shree Dolasnath Urban Cooperative Credit Union Talegaon Dabhade Officers Election Updates)
- पीएमआरडीए सदस्य आणि संस्थेचे आधारस्तंभ संतोष भेगडे यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती दिली. संस्थेचे प्रगतीचा आलेख सांगितला. संस्थेची सभासद संख्या – 4125, एकूण आर्थिक उलाढाल – 135 कोटी, ठेवी – 33 कोटी 50 लाख, कर्ज वाटप – 27 कोटी, निधी – 3 कोटी 25 लाख, गुंतवणूक – 14 कोटी 50 लाख आहे. संस्थेच्या 3 नवीन शाखा सोमाटणे फाटा, देहूगाव आणि कामशेत या ठिकाणी लवकरच कार्यरत होणार आहेत. तसेच संस्था डिजिटलायझेशनच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकत असून या मार्फत चांगल्या ग्राहकाभिमुख सेवा संस्था यापुढेही देणार आहे.
सत्कारास उत्तर देत असताना नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश राक्षे यांनी, ‘सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकत जी जबाबदारी दिली त्यामध्ये निश्चितच मी पतसंस्थेला प्रगती पथावर नेत पतसंस्थेच्या माध्यमातून तळागाळातील सर्व सामान्य लोकांना बचतीची सवय लावून कर्ज स्वरूपात कर्ज उपलब्ध करून जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न असणार आहे,’ असे म्हटले.
संस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे, पीएमआरडीए सदस्य संतोष भेगडे, माजी अध्यक्ष राहुल पारगे, शरद भोंगाडे, संचालक अंकुश आंबेकर आणि सर्व संचालक, सल्लागार आणि संस्थेचे सभासद, दैनंदिन बचत प्रतिनिधी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिव अतुल राऊत आणि आभार संचालक प्रवीण मुऱ्हे यांनी मानले.
अधिक वाचा –
– निगडे शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेराचे कवच! CCTV In School
– वेहेरगाव येथे ‘आयुष्मान कार्ड’साठी नोंदणी शिबिर, 150 नागरिकांनी केली नोंदणी, लाभार्थ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार!
– मोठी बातमी! शनिवारी होणारे पवना धरण पाणी बंद आंदोलन स्थगित, आमदार सुनिल शेळके यांची माहिती, कारण देखील सांगितले । Maval News