पवनानगर (प्रतिनिधी) : मावळ तालुका कोतवाल संघटनेचे मावळते अध्यक्ष सचिन घोणे यांच्या अध्यक्षतेखाली वडगाव मावळ या ठिकाणी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये मध्ये कोतवाल यांच्या समस्यां आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
त्यानंतर याबैठकीत सर्वानुमते संघटनेची नवनियुक्त कार्यकारणी निवड करण्याचे ठरविण्यात आले. संघटनेचे मावळते अध्यक्ष यांचा ठरल्याप्रमाणे कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी नव्याने नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. ( somnath kalekar appointed as president of maval taluka kotwal association see full list of new executive body )
नवीन कार्यकारिणी नियुक्ती खालीलप्रमाणे;
मावळ तालुका महसुल कोतवाल संघटना कार्यकारणी अध्यक्ष सोमनाथ कालेकर, उपाध्यक्ष विठ्ठल पाठारे, उपाध्यक्ष पुनम वाघमारे, सचिव प्रदिप राऊत, खजिनदार चंद्रकांत तळपे, कार्याध्यक्ष बाळासाहेब माने, सल्लागार सचिन घोणे, सदस्य पांडुरंग सावळे, सदस्य बाळासाहेब काजळे, सदस्य संजय कांबळे, सदस्य विजय शिरसाट, सदस्य सचिन शेळके, सदस्य अनुराधा देशमुख यांची नवनिर्वाचित नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी मावळ तालुक्यातील कोतवाल सागर जाधव, चंद्रकांत तळपे, रामदास कदम, गणेश टिळेकर, संभाजी कुटे, राहुल विधाते, पांडुरंग सावळे, श्रीपत गायकवाड यांच्यासह अनेक जण उपस्थितीत होते. नियुक्तीनंतर एकमेकांना पेढे भरवून, गुलाबपुष्प देऊन नवनिर्वाचित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करुन आंनदोत्सव साजरा करण्यात आला.
अधिक वाचा –
– पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे काम मार्गी लागणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता
– अंगावर काटा आणणारी बातमी..! आढले गावातील एकाच घरात सापडली घोणस सापाची तब्बल 20 पिल्ले