Dainik Maval News : राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे. अनेक मातब्बर नेत्यांनी मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात केली असून या रेसमध्ये मावळ विधानसभेचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांचे नाव देखील चर्चेत आहेत.
दरम्यान मंत्रिपदाची चर्चा होत असताना आमदार सुनील शेळके यांनी देखील यामुद्द्यावर भाष्य केले आहे. एका माध्यमांस दिलेल्या मुलाखतीत आमदार सुनील शेळके यांनी यांनी भविष्यात मंत्रीपदाची संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. “२०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतरही मी मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी पूर्णतः तयार होतो,” असे सूचक वक्तव्य देखील शेळके यांनी यात केले.
मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा विजयी मेळावा झाला, यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुनील शेळके यांना मंत्रिपद मिळावे असा एकमुखी ठराव मंजूर केला. यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार सुनील शेळके यांनी मी कधीही पक्षाचे वरीष्ठ पदाधिकारी किंवा अजितदादा यांच्याकडे मंत्रिपदाची मागणी केली नसल्याचे सांगितले. परंतु कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यांच्या अपेक्षा आहेत, त्यामुळे ते मागणी करतात. तसेच, “अजितदादा मला आज ना उद्या नक्की मंत्रीपदाची संधी देतील,” असेही आमदार शेळके यांनी स्पष्टपणे सांगितले.
राज्याचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संबंधित एका प्रकरणात न्यायालयाने कोकाटे यांना दोषी ठरवले आहे. उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देत मोठा दिलासा दिला असून त्यांची आमदारकी वाचली आहे. परंतु कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या विभागांचा पदभार सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी
– Dehu : देहू-येलवाडी रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी, लवकरच होणार काँक्रीटीकरण ; ‘पीएमआरडीए’कडून कार्यारंभ आदेश


