कामशेत जवळील खडकाळे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सोपान काटकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सोपान काटकर हे ग्रुप ग्रामपंचायत साई – पारवडी – नानोली ना. मा चे विद्यमान उपसरपंच आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
खडकाळे सोसायटीचे मावळते चेअरमन बाळासाहेब नानेकर यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे चेअरमन पद रिक्त झाले होते. त्यामुळे रिक्त पदासाठी विशेष सभा बोलावून निवड प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी विहित मुदतेत काटकर यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी राकेश निखारे यांनी सोपान काटकर यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी सोसायटीचे संचालक माऊली शिंदे, प्रकाश गायकवाड, बाळकृण गायखे आदी मान्यवर उपस्थित होते. सोपान काटकर यांच्या निवडीनंतर सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. ( Sopan Katkar elected as a Chairman of Khadkale Society Maval )
अधिक वाचा –
– पोल्ट्री व्यावसायिकांचा एल्गार, ‘या’ मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा, वाचा काय आहेत मागण्या
– मावळ तालुक्यात नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचे लवकर वाटप व्हावे – सकल मराठा समाज
– …तर अशा संबंधितांवर कठोर कारवाई करा – आमदार सुनिल शेळके यांची मागणी – पाहा व्हिडिओ । MLA Sunil Shelke