Dainik Maval News : मावळ तालुक्यात भात कापणी झालेल्या ठिकाणचे शेतकरी आता रब्बी हंगामातील विविध पिकांच्या तयारीत गुंतले आहेत. त्यासाठी जमिनीची नांगरणी करतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे. काही ठिकाणी पेरण्या देखील झाल्या आहेत.
तालुक्यात यंदा भात पीक चांगले आले होते. परंतु परतीच्या पावसाचा फटका काही भागातील शेतकऱ्यांना बसला. परंतु आता भाताची काढणी होऊन हाताशी आलेले पीक घरात नेल्यावर शेतकरी रब्बी हंगामासाठी सज्ज होतोय. तालुक्यात सध्या रब्बी हंगामाच्या भातशेतीच्या मशागतीची लगबग शेतांवर दिसत आहे.
मावळ तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतली जातात. त्यातही तालुक्यात प्राधान्याने गहू, ज्वारी, इतर तृणधान्ये, हरभरा, मसूर, घेवडा, पावटा, इतर कडधान्ये, करडई, इतर काही गळीतधान्य, मका, इतर काही चारा पिके घेतली जातात. तसेच रब्बी कांदा, बटाटा, टोमॅटो अशी काही भाजीपाला पिकेही घेतली जातात.
मावळ हा खरीप भात पिकाचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. असे असले तरीही तालुक्यात काही ठिकाणी खरीप हंगामात सोयाबीन, तूर आदी पिकांचीही लागवड होते. तसेच तालुक्यात रब्बीचे पीक सगळीकडे घेतले जातेच असेही नाही. मावळ तालुक्यात एकूण रब्बीचे क्षेत्र हे जवळपास ४ हजार ८६८ इतके आहे.
मावळात यावर्षी शंभर टक्केपेक्षा जास्त पाऊस झाल्याने तालुक्यातील जवळपास सर्वच धरणे भरली असून नदी, नाले, ओढे प्रवाहित आहेत. तसेच बंधारे, विहिरी पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. या पाण्याचा उपयोग शेतकरी रब्बी हंगामातील पिकांसाठी करीत असतात.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांना भेटण्यासाठी मावळच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांची गर्दी, महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती
– नवनिर्वाचित आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी घेतली आमदार सुनिल शेळके यांची भेट । Talegaon Dabhade
– स्तुत्य उपक्रम ! वडगाव मावळ शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रातील ४५५ विद्यार्थ्यांना उबदार स्वेटर भेट । Vadgaon Maval