पाटबंधारे विभागांतर्गत ( Irrigation Department ) मावळ तालुक्यात ( Maval Taluka) होत असलेल्या विविध कामांसंदर्भात मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांची पुणे येथील कार्यालयात शुक्रवारी अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक संपन्न झाली.
यावेळी, पवना नदीवरील ( Pavana River ) सुरू असलेल्या पुलांच्या बांधकामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. पवन मावळ ( Pavan Maval ) परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या पूलांची कामे सुरु आहेत. ती विहित वेळेत पुर्ण होताना दिसत नाहीत. याचा नाहक त्रास शालेय विद्यार्थी, नागरिकांना सहन करावा लागतो. त्यांना लांब दूरवरुन वळसा मारुन प्रवास करावा लागतो. त्यामुळे जी पाटबंधारे विभागामार्फत जी कामे संथगतीने सुरु आहेत, त्या कामांना गती द्यावी, अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांनी यावेळी बैठकीत केली. ( Special Meeting of Maval MLA Sunil Shelke With Irrigation Department Officials )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वडिवळे उजवा / डावा कालव्याच्या प्रलंबित राहिलेल्या कामास सुरुवात व्हावी, अशी आग्रही मागणी देखील आमदार शेळेक यांनी या बैठकीत केली.
सदर बैठकीत विकास कामांमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी, स्थानिक समस्या आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत आमदार शेळके यांच्यासमवेत मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, कार्यकारी अभियंता विजय पाटील, राज धोडपकर आदी उपस्थित होते. ( Irrigation Department Pune Special Meeting of Maval MLA Sunil Shelke With Officials )
अधिक वाचा –
लम्फीचा प्रादुर्भाव; आमदार सुनिल शेळकेंचे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन
श्री क्षेत्र देहू नगरपंचायतच्या पायाभूत सुविधा आणि विकासकामांचा आमदार सुनिल शेळकेंनी घेतला आढावा