व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिळींब गावात भरली एसआरटी भात पीक उत्पादन शेतीशाळा; युवा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परिसरात भात पीक जोमदार आले आहे. भातपिकासाठी आताचा कालावधी हा महत्वपूर्ण आहे, कारण भात पीक कापणी योग्य झाले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 13, 2023
in लोकल, ग्रामीण
Farm-School

Photo Courtesy : Vikas Gosavi


पवन मावळ भागातील मौजे शिळींब या गावात कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन 2023-24 खरीप हंगाम अंतर्गत एस.आर.टी. भात उत्पादन तंत्रज्ञान या विषयावरील शेतीशाळा वर्ग विजय हिरेमठ (प्रकल्प संचालक, आत्मा पुणे) आणि दत्तात्रय पडवळ (तालुका कृषि अधिकारी, मावळ) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. शेतीशाळेला राहुल घोगरे (बीटीएम – आत्मा), विकास गोसावी (कृषी सहाय्यक शिळींब) आणि कृषी मित्र लहू धनवे यांनी मार्गदर्शन केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शिळींब गावातील शेतीशाळेच्या वर्गात आतापर्यंत वर्गामध्ये शेतीशाळा म्हणजे काय? भात पिक बियाणे निवड, भात बीज प्रक्रिया, गादी वाफे तयार करणे, गादी वाफ्यावर भात बियाणे आणि खते पेरणी, युरिया ब्रिकेटचा वापर, कीड आणि रोग मार्गदर्शन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर वर्गामध्ये शेतीशाळा प्रतिज्ञा घेऊन सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मागील वर्गाचा आढावा घेण्यात आला. सध्यास्थिती शिळींब गावात भात पीक कापणी चालू झाली आहे.

परिसरात भात पीक जोमदार आले आहे. भातपिकासाठी आताचा कालावधी हा महत्वपूर्ण आहे, कारण भात पीक कापणी योग्य झाले आहे. त्याअनुषंगाने शिळींब येथे घेण्यात आलेल्या शेतीशाळेमध्ये राहुल घोगरे यांनी वैभव विळ्याने कापणी कशी करावी, हे वैभव विळा दाखवून मार्गदर्शन केले. कृषि सहाय्यक विकास गोसावी यांनी रब्बी हंगाम ज्वारी मिनिकीट वाटप करून माहिती दिली. शेतीशाळेमध्ये शेतकऱ्यांना रब्बी ज्वारी पीक मिनिकीट मान्यवराच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी राहुल घोगरे, अमित मगर, पोलिस पाटील संदीप बिडकर, संतोष कडू, नंदू धनवे, अंकुश ओव्हाळ, संतोष शिंदे, दत्तात्रय शिंदे, गोरख गायकवाड, दिलीप शिंदे, प्रकाश जगताप, संजय ढमाले, चंद्रकांत धनवे, अनंता केदारी, संभाजी कडू, प्रभाकर सुतार, सुरेश धनवे, बाळू आखाडे शेतकरी उपस्थित होते. ( SRT Rice Crop Production Farm School shilimb village Maval )

“शेतकऱ्याची शेतीशाळा हा उपक्रम भात बियाणे निवड ते पिकाच्या कापणी पश्चात भात पीक नियोजन असल्याने शेतकऱ्यांना पिकाच्या विविध टप्प्यावर माहिती मिळणार असल्याने त्याचा भात पिंपरी घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.” – दत्तात्रय पडवळ (कृषी अधिकारी, मावळ)

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील बहुचर्चित वाकसई ग्रामपंचायतीची निवडणूक 20 डिसेंबरला, वाचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अखेर गोड, तब्बल ‘इतका’ बोनस मंजूर
– धक्कादायक! लोणावळ्यात कंटेनरचा भीषण अपघात, पलटी होताना दोन दुचाकींना धडक, 3 जण जागीच ठार


Previous Post

लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी अशोक साबळे; पंडित पाटील यांची सांगली जिल्ह्यात बदली

Next Post

गतवर्षी 24 रुपये, यंदा इंद्रायणी भाताला किती दर मिळणार? आमदार सुनिल शेळकेंच्या घोषणेकडे सर्वांचेच लक्ष

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Sunil-Shelke

गतवर्षी 24 रुपये, यंदा इंद्रायणी भाताला किती दर मिळणार? आमदार सुनिल शेळकेंच्या घोषणेकडे सर्वांचेच लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Demand to speed up third and fourth tracks of Pune-Lonavala railway after substantial provisions in budget

राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी

March 14, 2026
PM-Kisan-Samman-Nidhi

गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण

March 14, 2026
Rain

राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 14, 2026
Action taken by Talegaon traffic police on vehicles with black glass

मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली ; एलईडी दिव्यांमुळे होताहेत अपघात

March 13, 2026
Truck transporting fish overturns on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी

March 13, 2026
Pistol selling gang busted Police raid in Somatane Phata Maval area three accused arrested

पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; सोमाटणे फाटा परिसरात पोलिसांची धडक कारवाई, तीन आरोपी गजाआड

March 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.