मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने राज्यस्तरीय मराठा आरक्षण मंथन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील कोथूर्णे (पो. पवनानगर) इथे भैरवनाथ सभागृह इथे दिनांक 06 मे 2023 रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही परिषद होणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संतोष काळूराम दळवी यांनी दैनिक मावळला दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. त्यामुळे मराठा समाजात संभ्रम व निराशा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सध्या समाजापूढे कायदेशीर व घटनात्मक मार्ग काय आहेत? सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मराठा आरक्षण याचिकेवर निर्णय देताना काय अपेक्षा व्यक्त केल्या आहेत? आता आरक्षण नेमके कुठे आणि कसे अडले आहे? आरक्षण देण्याचा नेमका अधिकार राज्य शासनास आहे किंवा केंद्र शासनास आहे, आदी आरक्षणा विषयी प्रश्न सर्वसामान्य समाज बांधवांच्या मनात निर्माण झाले आहेत. तसचे आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभुमीवर विविध न्याय निवाडे, सर्वोच्च न्यायालयाचे विवीध निकालांचे दाखले आहेत काय? आदी विषयांवर यावेळी चर्चा आणि तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधीनी या मंथन परिषदेसाठी उपस्थित राहणार असून सर्व सामान्य नागरिक आणि या विषयाशी अनुसरून कार्यरत असलेले विविध जिल्ह्यातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. ( State level Maratha reservation brainstorming conference organized at Kothurne in Maval Taluka )
अधिक वाचा –
– श्री विठ्ठल परिवार मावळ व सकळ दिंडी नियोजन समिती यांकडून कान्हे इथे बाल वारकरी प्रशिक्षण शिबिर, जाणून घ्या
– ‘शिवदुर्ग मित्र’कडून आयोजित ‘लोणावळा बोल्डरींग चॅम्पियनशिप 2023’ स्पर्धा उत्साहात संपन्न, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी