Dainik Maval News : कामशेत शहरात लोक वर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य असा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. कामशेत ग्रामपंचायतीचे सरपंच रूपेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ग्रामसभेत याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सदर ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि तरुण वर्ग उपस्थित होता. पुतळा निर्माण झाल्यानंतर त्याची सर्व देखभाल करण्याची जबाबदारी ही कामशेत ग्रामपंचायतीची असेल असेही ठरवण्यात आले. ( statue of Chhatrapati Shivaji Maharaj will be erected in Kamshet Maval )
कामशेत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोक वर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. सुमारे वीस फूट उंच, अठरा फूट लांब आणि अठरा फूट रुंद अष्टकोनी चबुतरावर पुतळा उभारण्यात येणार आहे. सदर पुतळ्याचे काम शिल्पकार दीपक थोपटे यांना सर्वानुमते देण्याचे ठरविण्यात आले.
अधिक वाचा –
– तळेगाव नगरपरिषदेकडून शहरातील नोंदणीकृत 378 दिव्यांग लाभार्थींना अनुदानाचे वाटप । Talegaon Nagar Parishad
– रेड्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, मावळातील कुसगाव येथील घटना, कुटुंबीयांना शोक अनावर । Maval News
– आता प्रत्येक शाळा, कॉलेजसाठी पोलीस अधिकारी, अंमलदार यांची नियुक्ती ; आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची सुचना