होळी आणि धूलिवंदन सणाच्या निमित्ताने मंगळवारी (दिनांक 7 मार्च) वडगाव येथील जय बजरंग तालीम मंडळाच्या वतीने पारंपरिक दगडी गोट्या उचलण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच यावेळी सर्वाधिक बैठका मारून विक्रम करणाऱ्या खेळाडूला चांदीची गदा भेट देण्यात येणार आहे. जय बजरंग तालीम मंडळाचे अध्यक्ष उमेश ढोरे यांनी ही माहिती दिली. ( Stone Lifting Competition At Shri Potoba Maharaj Temple In Vadgaon Maval )
वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात मंगळवारी (7मार्च) सकाळी 9 वाजता या खेळाला सुरुवात होईल. यावेळी उद्घाटक म्हणून आमदार सुनिल शेळके, यांच्यासह तहसीलदार मधुसूदन बर्गे, पोलिस निरीक्षक विलास भोसले आदीजण यावेळी उपस्थित राहणार आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळात मनसेचा डंका! वडगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदी सायली म्हाळसकर बिनविरोध
– मावळात पुढचा आमदार भाजपचाच करायचा..! मावळ विधानसभा भाजप कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात संकल्प
– चांदखेड आणि शिवणे गावातील विकासकामांचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भुमिपूजन