मावळ तालुक्यातील वनपरिक्षेत्र शिरोता मधील वन परिमंडळ उकसान येथील मौजै शिरदे गावात बिबट्या ला पकडण्यात (दि. 15) वनविभागाला यश आले आहे. गावात बिबट हा वन्यप्राणी असल्याचे समजताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट पुणे टीम सदर ठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी परिसराची पाहणी केली असता, एका गोठ्यात बिबट्या असल्याचे आढळून आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
बिबट्या अस्वस्थ असल्याचे तज्ञ पशुवैद्कीय डॉक्टर यांच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्या अनुषंगाने वन विभाग आणि रेस्कु टीम यांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याचे यशस्वीरित्या रेस्क्यु करण्यात आले. सदर बिबट्यास पुढील तपासणी आणि उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्र पुणे येथे तत्काळ पाठविण्यात आले आहे. ( Success in catching a leopard in Shirde village of Maval taluka )
सदरची कामगिरी एन आर प्रविण (मुख्य वनसंरक्षक पुणे), महादेव मोहिते (उपवनसंरक्षक पुणे), मयुर बोठे (स.वं.स पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुशील मंतावार (वनपरिक्षेत्र अधिकारी) यांच्या नियंत्रणात मंजुषा घुगे (वनपाल), गजेंद्र भोसले (वनरक्षक), युवराज साबळे (वनरक्षक), दिपक उबाळे (वनरक्षक), सुरेश ओव्हाळ, शंकर घुले तसेच रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट चे सोनेश इंगोले (Rescue Head), चेतन वंजारी (Vet Head), पूर्वा निमकर, नरेश चांडक, सायली पिलाने, वैष्णवी भांगरे, सागर शिंदे, केतन वैद्य यांच्या परिश्रमातून यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. सदर कामगिरीबद्दल वनविभागाचे मावळ परीसरात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अधिक वाचा –
– देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा घडविणारी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठांना मिळणार लाभ
– पर्यावणपूरक गणेशोत्सव सजावटीसाठी प्रसिद्ध असलेल्या वर्तक परिवाराचा अमृतमहोत्सवी संकल्प । Lonavala News
– गहुंजे येथे मतदार नोंदणी अभियान ; ‘मतदानाचा हक्क बजावून योग्य व्यक्तीच्या हाती सत्ता द्यावी’ – साहेबराव बोडके