Dainik Maval News : मावळ तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेल पक्षाचे एकेकाळचे खंदे नेतृत्व व अजित पवार यांचे विश्वासू समजले जाणारे बापूसाहेब भेगडे हे आता भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याचे समजत आहे. त्यांच्या समर्थकांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या माहितीनुसार बापूसाहेब भेगडे यांच्या नेतृत्वात त्यांचे हजारो समर्थक आज, सोमवार (१५ सप्टेंबर) रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथील पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार आहे. नेमके कोणकोणते पदाधिकारी प्रवेश करणार याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे पुढील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सर्व समावेशक नेतृत्व आहे, या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील बापूसाहेब भेगडे समर्थक बापूसाहेब भेगडे यांच्या नेतृत्वात सोमवार (दि. १५) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाषराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजप पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि १४) वडगाव मावळ येथे सकाळी ११ वा. घेतलेल्या पत्रकार परिषदेत संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाषराव जाधव यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धनचे माजी सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याणचे माजी सभापती अतिश परदेशी, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते किशोर भेगडे,मावळ पंचायत समितीचे माजी गटनेते सचिन घोटकुले, खरेदी विक्री संघाचे सभापती शिवाजी असवले,उद्योजक संतोष मु-हे,माजी सरपंच कैलास खांडभोर उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षात प्रवेश करणारे हे सर्वजण पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी ह्या गटाने अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचे काम केले होते. तोच गट भाजपात प्रवेश करणार आहे. मुंबई येथील भारतीय जनता पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश होणार आहे. सोमवारी सकाळी सोमाटणे फाटा येथून भेगडे समर्थक पक्ष प्रवेशासाठी मुंबईला रवाना होणार आहे. नेमके किती भेगडे समर्थक पक्ष प्रवेश करणार आहेत याबाबत उत्सुकता कायम आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ग्लास स्काय वॉक प्रकल्पाबाबत विशेष बैठक संपन्न । Lonavala Glass Sky Walk
– अल्पवयीन मुली, महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी
– उर्से खिंडीत गणेशमूर्ती आढळल्याने खळबळ; संकलित केलेल्या मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन न केल्याने नागरिकांचा संताप । Maval News
– अजित पवार यांच्या सूचनेनंतर चाकणमधील अतिक्रमणविरोधी कारवाईला वेग ; पीएमआरडीएकडून कारवाई सुरू । Chakan News