व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मरावे परी कीर्ती रूपे उरावे! दशक्रिया विधीलाही टाळ्यांचा कडकडाट – Maval News

'मरावे परी कीर्ती रूपे उरावे' ह्या उक्तीप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानंतर त्याच्या कीर्तीचे गोडवे गायले जातात आणि उपस्थितांचे डोळे पाणवतात, असे क्षण पाहायला क्वचितच मिळतात.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 10, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Takwe-Budruk-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ ह्या उक्तीप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानंतर त्याच्या कीर्तीचे गोडवे गायले जातात आणि उपस्थितांचे डोळे पाणवतात, असे क्षण पाहायला क्वचितच मिळतात. परंतू मावळ तालुक्यात शनिवारी (दिनांक 9 सप्टेंबर) रोजी हे चित्र पाहायला मिळाले. मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक गावातील माजी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी पोलिस पाटील कै विठ्ठल दगडू असवले पाटील यांचे गुरुवार (दिनांक 31 ऑगस्ट) रोजी निधन झाले. समाजकार्यात नेहमी अग्रस्थानी राहणारे असवले पाटील यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करणात आला. त्यानंतर शनिवारी (9 सप्टेंबर) कै विठ्ठल असवले यांच्या दशक्रिया विधीला अपेक्षेप्रमाणे मोठा जनसमुदाय गोळा झाल्याचे पाहायला मिळाला. ( Takwe Budruk Maval Shok Sabha thousands of people attended vitthal asawale condolence meeting )

दशक्रिया विधीला उपस्थित हजारोंच्या जनसमुदायात अनेक मान्यवर नेते, विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, कात्रज डेअरीचे माजी चेअरमन बाळासाहेब नेवाळे, बाळासाहेब काशिद, महाराष्ट्र प्रदेश पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, भाजपा तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, शिवसेना तालुका प्रमुख राजु खांडभोर, मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळस्कर, राष्ट्रवादी कार्यध्यक्ष दीपक हुलावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांनी कै विठ्ठल असवले पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मनोगत व्यक्त करताना अनेकांनी असवले पाटील यांच्या आठवणी जागवल्या. असवले यांनी समाजासाठी केलेल्या कार्याची मान्यवरांनी आठवण काढताना उपस्थितांनीही टाळ्यांचा गजर करुन त्याला प्रतिसाद दिला. मदन बाफना यांनी कै विठ्ठल असवले यांचे जीवनकार्य श्रद्धांजली सभेत उलगडून दाखवले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजून त्याचे समर्थन केले. सामाजिक, राजकीय, कला, क्रिडा, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजली सभेचे सूत्रसंचालन राजु शिंदे आणि मारुती असवले यांनी केले.

टाकवे बुद्रुक गावचे माजी पोलिस पाटील कै. विठ्ठल असवले यांचे दिनांक 31 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा आणि सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या स्नुषा सुवर्णा असवले ह्या टाकवे बुद्रुक गावच्या विद्यमान सरपंच आहेत. कै विठ्ठल असवले (पाटील) यांच्या दशक्रिया विधी दिनी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (आळंदीकर) यांची प्रवचन सेवा झाली. ( Takwe Budruk Maval Shok Sabha thousands of people attended vitthal asawale condolence meeting )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘त्याचा हसतमुख चेहरा असाच कायम स्मरणात राहील’, मावळच्या शहीद सुपुत्राच्या कुटुंबीयांचा प्रेरणादायी निर्णय
– पोलिसांची दबंग कामगिरी! लोणावळ्यात घरफोडी करणारी टोळी जेरबंद, एकाचवेळी दहा गुन्ह्यांची उकल, लाखोंचा मुद्देमाल जप्त
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या अकार्यक्षम मुख्याधिकाऱ्यांची बदली करा’, आमदार सुनिल शेळकेंचे नगरविकास विभागाला पत्र, वाचा


Previous Post

गणेश उत्सवासाठी पोलिस आणि प्रशासनाची तयारी पूर्ण; राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदीचे आदेश निर्गमित । Raigad News

Next Post

सर्वात मोठी बातमी! कोपर्डी बला’त्कार प्रकरणातील प्रमुख आरोपीची येरवडा कारागृहात आत्म’हत्या

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Yerawada

सर्वात मोठी बातमी! कोपर्डी बला'त्कार प्रकरणातील प्रमुख आरोपीची येरवडा कारागृहात आत्म'हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Gudi Padwa day became historic stolen spire of temple of Goddess Ekvira Devi was recovered after 8 years

यंदाचा गुढीपाडवा ठरला ऐतिहासिक ! आई एकविरा देवीच्या मंदिराचा चोरीला गेलेला कळस तब्बल ८ वर्षांनी मिळाला परत

March 21, 2026
Pimpri-Chinchwad Municipal Corporation

‘पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पवना प्रकल्पातून 520 एमएलडी आणि आंद्रा प्रकल्पातून 100 एमएलडी पाण्याचे नियोजन’

March 21, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा शासनाचा निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 21, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

महसूल विभागात मोठा गैरप्रकार ! हजारो शेतकऱ्यांचे सातबारे बदलले ? महसूल कायद्याच्या कलम १५५ चा गैरवापर झाल्याची सरकारची कबुली

March 21, 2026
Mega plan to break traffic jam at Chakan Chowk Plans to create 4 new missing links like Mumbai-Pune missing link

चाकण चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन ! मुंबई-पुणे मिसिंग लिंक सारखे 4 नवीन मिसिंग लिंक तयार करण्याचे नियोजन

March 21, 2026
Second-Registrar-Office-Vadgaon-Maval

मोठी बातमी ! सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

March 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.