बेकायदेशीररित्या दारूचा साठा आणि विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या घरावर छापा मारून मुद्देमाल जप्त केल्याची घटना मावळ तालुक्यातील जांबवडे गावात घडली. पोलिसांनी प्राप्त माहितीच्या आधारे बुधवारी, दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी पाऊणे दोनच्या सुमारास जांबवडे (ता. मावळ) गावातील पाण्याच्या टाकी जवळील कैलास भांगरे याच्या घरावर छापा टाकला आणि जागेवर मुद्देमाल जप्त करून कारवाई केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिस नाईक गणेश सिताराम कोकणे (दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी कैलास बलवंत भांगरे (वय 45 वर्षे, रा. जांबवडे गाव, ता. मावळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अटकेत नसून पोलिस हवालदार भोजणे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. ( Talegaon MIDC Police raid in Jambhavade Village Maval )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्त माहितीनुसार पोलिस पथकाने संबंधित संशयिताच्या घरी छापा टाकला असता, तिथे त्याच्या कब्ज्यात गावठी हातभट्टीची 70 लीटर तयार दारू, देशी दारूच्या 53 बाटल्या आणि रोख रक्कम असा एकूण मिळुन किंमत रुपये 18,405 रूपयेचा प्रतिबंधित माल बेकायदेशिररित्या, अनाधिकाराने, विनापरवाना विक्री करण्याकरीता जवळ बाळगला असताना मिळून आला. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिस करत आहेत. ( case registered in case of illegal stocking of village liquor )
अधिक वाचा –
– श्रीविठ्ठल मंदिर संस्थान तळेगांव दाभाडे यांच्या वतीने श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन
– बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तीला पिस्तूल आणि जीवंत काडतूसासह रंगेहात अटक; लोणावळा पोलिसांची कारवाई
– मावळातील ‘दादा’ गटाची ताकद दिसणार! राष्ट्रवादीकडून आंदर मावळ विभागात शुक्रवारी स्नेह मेळाव्याचे आयोजन