मावळ तालुक्यातील उकसान येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्याने सुमारे 98 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या योजनेचा भूमिपूजन समारंभ मंगळवारी (दिनांक 22 नोव्हेंबर) महिला भगिनींच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. ( Tap Water Supply Scheme In Uksan Village Maval Taluka Under Jal Jeevan Mission Scheme )
जल जीवन मिशन योजना अंतर्गत उकसान नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 98 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, गावासह दोन्ही पठारावरील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहचविण्याचे उद्दिष्ट यामुळे साध्य होणार आहे. या निधीतून शेडगे वस्ती येथे दहा हजार लिटर क्षमतेची व आखाडे वस्ती येथे दहा हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि सुमारे 12 किलोमीटर लांबीची पाणी वितरण व्यवस्थेची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
उकसान येथील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला.'जल जीवन मिशन' अंतर्गत या पाणी पुरवठा योजनेसाठी९८लक्ष रु.निधी उपलब्ध झाला आहे.या समारंभास जेष्ठ मान्यवर,आजी-माजी सरपंच,सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. pic.twitter.com/YQz5jGRSLF
— Sunil Shelke (@shelkesunilanna) November 22, 2022
वडिवळे प्रकल्पाच्या जवळ असलेल्या डोंगरावरील उकसान पठारावर लोकवस्ती असून याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसाठी पाणी पुरवठ्याची सोय नसल्याने येथील नागरिकांना विहिरी व डबक्यातील दुषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत होते. तसेच यासाठी देखील त्यांना प्रचंड पायपीट करावी लागत होती. या समस्येची आमदार सुनिल शेळके यांनी दखल घेत सातत्यपूर्ण पाठपुरावा करून उकसान गाव व पठारावरील नागरिकांसाठी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेमुळे येथील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहचणार असल्यामुळे ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष दिपाली गराडे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, पीएमआरडीए सदस्य दिपाली हुलावळे, संगिता शेळके, शशिकला सातकर, करंजगाव सरपंच दिपाली साबळे, उकसान सरपंच शामल इंगवले, उपसरपंच अमोल शिंदे, सदस्य आशा बांदल,आशा मोरमारे, सारिका कोंढरे,सिता शिंदे, निशा कोंढरे, पोलीस पाटील सुषमा शिंदे,साईनाथ गायकवाड, कैलास गायकवाड,दत्तात्रय पडवळ, बाबाजी गायकवाड,भाऊसाहेब मोरमारे, अमोल कोंडे, माजी सरपंच संतोष कोंढरे,सोमनाथ शिंदे,सुभाष शिंदे, बाळासाहेब शिंदे, गुलाब कोंढरे आदि.उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंटामुक्ती अध्यक्ष नितीन शेलार यांनी तर माजी उपसरपंच सोमनाथ शिंदे यांनी आभार मानले.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे । हातचलाखीने एटीएम काढून घेत वयोवृद्ध व्यक्तीची 85 हजारांची फसवणूक
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम, थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट