मावळ तालुक्यातील सांगिसे गावातील पाणीप्रश्न आता मिटणार आहे. लवकरच या गावात घरोघरी नळाद्वारे पाणी पोहचणार आहे. यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेचा भुमिपूजन समारंभ बुधवारी (1 मार्च) रोजी पार पडला. ( Tap Water Supply Scheme Sangise Maval Bhumipujan Ceremony Jal Jeevan Mission )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘जल जीवन मिशन’ अंतर्गत मावळ तालुक्यातील सांगिसे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी संपन्न झाला. या पाणी योजनेसाठी तब्बल 1 कोटी 92 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला असुन लवकरच सांगिसे गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्यास मदत होईल. सदर कार्यक्रमाला सारिका सुनिल शेळके यांसह अनेक जेष्ठ मान्यवर,आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला-भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– सोमाटणे इथे पवना नदीच्या बाजूला पोलिसांचा छापा, तब्बल 1 लाखाच्या गांजासह आरोपी अटकेत
– एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात प्रथम, मुलींमध्ये ‘हिने’ मारली बाजी