कार्ला-मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवर नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे नव्या पुलाशेजारी पर्यायी पूल बांधण्यात आला आहे. या पर्यायी पुलावरून शुक्रवारी सकाळच्या सुमारास कार्ला येथील एक आदिवासी व्यक्ती वाहून गेली होती. त्या व्यक्तीचा शोध घेण्यात शोध पथकाला यश आले आहे. तब्बल दोन दिवसांनी सदर व्यक्तीचा मृतदेह जलपर्णीत सापडला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शनिवारी सायंकाळी शिवदुर्ग टीमच्या शोध पथकाच्या हाती मृतदेह लागला. भीमा सखाराम पवार (वय अंदाजे ५० वर्ष, रा. कार्ला, ता. मावळ) असे सदर वाहून मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कार्ला मळवली दरम्यान असलेल्या इंद्रायणी नदीवरील पूल जीर्ण झाला असल्याने तो पूल पाडून त्या ठिकाणी नव्याने मोठा व रुंद पूल बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र त्या मागणीकडे काहीशी दुर्लक्ष झाल्याने पावसाळा सुरू झाला, तरी पुलाचे काम मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. ( team of Shivdurg Mitra found body of person who was washed away in Indrayani river during karla malvali )
शिवदुर्ग मित्रचे अशोक उंबरें, प्रणय अंबुरे, मनोहर ढाकोळ, दिपक भोरडे, योगेश दळवी, कुणाल कडु, दिंगबर पडवळ, मोरेश्वर मांडेकर, निलेश गराडे, गणेश गायकवाड, मयुर दळवी, अजय मावकर, सागर कुंभार, अनिल आंद्रे, साई शिंदे, अमोल बामणे, महेश मसने, सुनिल गायकवाड यासह कार्ला मळवली येथील पोलिस पाटील, स्थानिक ग्रामस्थ, वाहून गेलेल्या व्यक्तीचे नातेवाईक आणि पोलिस प्रशासन यांनी शोधमोहिमेत अथक प्रयत्न केले.
अधिक वाचा –
– भटके, विमुक्तांना आता ओळखपत्र आणि वास्तव्याच्या पुराव्याविना मिळणार रेशनकार्ड ; महाराष्ट्र सरकारचा निर्णय
– महत्वाचे ! ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेतील काही अटी बदलल्या, अनेक कागदपत्रांसाठी पर्याय उपलब्ध, जाणून घ्या
– ‘भारत हा क्रिकेटचा विश्वगुरू असल्याचे संघाने सिद्ध केले’ – मुख्यमंत्री शिंदे ; महाराष्ट्र सरकारकडून विश्वविजेत्या संघाला 11 कोटींचे बक्षीस