वडगाव मावळ शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी समस्येसाठी आजवर अनेकदा आंदोलने झाली, मोर्चे निघाले. त्यानंतर नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी त्यावर मार्ग काढण्याचेही अनेकदा प्रयत्न केले. प्रशासनाला हाताशी धरुन काही उपाययोजना केल्या. परंतू, संपूर्ण वडगावकरांसाठी महत्वाची असणारी नवीन पाणी योजना कधी होणार, याकडे सर्वांचेच डोळे लागून राहिले होते. अखेर याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. ( Technical Approval For Vadgaon Maval City Water Supply Scheme )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, वडगाव नवीन पाणी योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे, स्वतः नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. वडगाव शहरवासीयांच्या प्रतिक्षेत असलेली सुमारे 39 कोटी 5 लक्ष 96 हजार रुपयांच्या फिल्टर पाणी योजनेस तांत्रिक मंजुरी मिळाली आहे.
अधिक वाचा –
–वडगाव शहरातील ‘या’ भागाला मिळाली नवी ओळख, पाहा जागेचे नवीन नामकरण काय? I Vadgaon Maval
– आमदार शेळके, माऊली दाभाडे यांच्या उपस्थितीत व्यापारी आणि शेतकरी बांधवांची भात खरेदी संदर्भात संयुक्त बैठक