Dainik Maval News : कामशेत घाटाजवळ जय मल्हार हॉटेलजवळील वळणावर रविवारी (दि.1) सायंकाळी एक गंभीर अपघात झाला. पुण्याकडून मुंबईकडे जाणारा कंटेनर ट्रक (क्रमांक एम.एच ४३ टी एल ९७१०) अचानक डिव्हायडर ओलांडून मुंबईच्या बाजूकडील मार्गावर आला, ज्यामुळे मोठा लोखंडी पाईप रस्त्यावर पडला आणि एकूण चार वाहनाचा अपघात झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हुंडाई आय २० (क्र.एम.एच ४३ बी.बी ७८७३) या गाडीतून प्रवास करणाऱ्या अनिकेत संतोष शिंदे (वय २१, रा. नेरूळ, मुंबई) व यज्ञेश मधुकर गोलंबे (वय१९, रा. नेरूळ, मुंबई) यांना दुखापत झाली आहे. इको गाडी (क्र:एम.एच १४ एस.एच३२६५) या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर दुचाकी (क्र:एम एच१२ के.एन ७९४९) अनिकेत संतोष शिंदे आणि अंगथाई फ्रू मोग (वय २५, रा. त्रिपुरा) यांना गंभीर दुखापत झाली असून पायी जाणाऱ्या अनुसया प्रभाकर खांडेकर (वय ५०, रा. कुसगाव, मावळ) व चिंगुबाई लहु सुराणा (वय ३०, रा. कामशेत) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींना त्वरित नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक तपासात कंटेनर ट्रक चालक अशोक रामचंद्र गवित (रा. कोरडा, ता. नवापूर, जि. नंदुरबार) याच्या निष्काळजीपणे वाहन चालविण्यामुळे अपघात झाल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कामशेत पोलीस करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोणतेही खाते दिले तरीही मी जनतेला न्याय मिळवून देईन – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke
– अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात तरुणाला 20 वर्षांची सक्तमजुरी ; वडगाव मावळ कोर्टाचा निर्णय । Maval Crime
– पराजय स्वीकारायचा असतो आणि विजय झाला तर हुरळून जायचे नसते – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade