Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी (दि. 19) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गोंडुब्रे गावाजवळील नदीकाठी एक महिला अडकून पडली होती. तिला मध्यरात्री रेस्क्यू करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामस्थांनी “नदीकाठी कोणी तरी मदतीसाठी आवाज देत आहे” अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याला दिली. त्यानंतर पोलिस कर्मचारी प्रशांत सोनवणे यांनी तत्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. गराडे यांनी लगेचच संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीला सतर्क केले.
यानंतर विनय सावंत, कमलेश राक्षे यांसारखे स्वयंसेवक तसेच तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जोरदार पावसातही जीवाची पर्वा न करता मदतकार्य सुरू केले. नदीच्या प्रवाहात झाडाला लटकून जीव वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या महिलेपर्यंत पोहोचून तिला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
महिलेला तातडीने प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या धाडसी आणि तत्पर बचाव मोहिमेमुळे ग्रामस्थांनी तळेगाव दाभाडे पोलिस दल व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे मन:पूर्वक कौतुक केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– लोणावळा शहरात अतिमुसळधार पाऊस, 24 तासांत विक्रमी 432 मिलिमीटर पावसाची नोंद; आज शाळा, कॉलेजेस बंद । Lonavala Rain
– आनंदाची बातमी ! पवना धरण 100 टक्के भरले, धरणाचे सहाही दरवाजे उघडले, 5720 क्युसेक विसर्ग सुरू । Pawana Dam Updates
– छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश; शिवसेना खासदारांकडून पंतप्रधानांचे आभार
