व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, February 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘काँग्रेस-राष्ट्रवादीने लादलेला शास्तीकर युती सरकारने माफ केला, शिंदे-फडणवीसांचा भव्य नागरी सत्कार होणार’, खासदार बारणेंची माहिती

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवडकरांवर लादलेला जिझिया शास्तीकर माफ करण्याचा दिलेला शब्द शिवसेना-भाजपच्या युती सरकारने पाळला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 5, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
cm-eknath-shinde-and-mp-shrirang-barne

Photo Courtesy : MP Shrirang Barne


काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवडकरांवर लादलेला जिझिया शास्तीकर माफ करण्याचा दिलेला शब्द शिवसेना-भाजपच्या युती सरकारने पाळला आहे. शहरवासीयांचे ४६० कोटी ५५ लाख रुपये शासनाने माफ केले आहेत. मागील अनेक वर्षांपासून जनतेच्या डोक्यावर असलेला बोजा कमी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लवकरच शहरवासीयांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचे शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफ केल्याचा अध्यादेश राज्य शासनाने ३ मार्च रोजी जारी केला. सरकारने दिलेले वचन पाळल्याने एका खासगी कार्यक्रमासाठी पुण्यात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार बारणे यांनी भेट घेवून आभार मानले. शहरवासीयांच्यावतीने करण्यात येणाऱ्या सत्कारासाठी वेळ देण्याची विनंती केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते. ( To Felicitate CM And DCM Of Maharashtra For Abolition of Penal Tax Of Pimpri Chinchwad City Said MP Shrirang Barane )

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने शहरातील अवैध बांधकामांवर शास्तीकर लादला होता. त्यामुळे सुमारे 1 लाख मिळकतधारकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत होता. शास्तीकर रद्द करण्यासाठी अनेकवेळा मोर्चे, आंदोलने केली. पण, जनतेच्या मुळावर उठलेल्या तत्कालीन आघाडी सरकारला पाझर फुटला नाही. शास्तीकर माफ केला नाही. भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर हा प्रश्न सोडवण्यासाठी मी सतत पाठपुरावा केला व आमदार महेश लांडगे यांनी देखील विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

हेही वाचा – चांदखेड आणि शिवणे गावातील विकासकामांचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भुमिपूजन

पिंपरी-चिंचवड शहरात पाच लाख ९१ हजार १५० मालमत्ता आहेत. त्यापैकी ९७ हजार ६९९ अवैध मालमत्तांना शास्तीकर लागू झाला होता. त्यातील एक हजार चौरस फुटापर्यंतच्या ६० हजार ८३ अवैध मालमत्तांचा भाजप-शिवसेनेचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीकर माफ केला होता. आता चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शास्तीकर पूर्णपणे माफ केला जाईल. आचारसंहिता संपताच शासन आदेश काढण्याचे आश्वासन दिले होते. आचारसंहिता संपताच शासन आदेश काढला. त्याचा ३१ हजार ६१६ मालमत्तांना लाभ झाला. त्यांचा ४६० कोटी ५५ लाख रुपयांचा शास्तीकर पूर्णपणे माफ झाला आहे. दिलेले वचन सरकारने पाळले. प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा देण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. लवकरच हा प्रश्नही निकाली निघेल असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा –

– धक्कादायक! मुंबईत मरीन ड्राईव्ह भागात बसण्यासाठी पोलिसाने यूपीआयद्वारे घेतली लाच, ट्वीट जोरात व्हायरल
– ‘वडगाव शहरातील ओढ्या-नाल्यांतील राडारोडा तातडीने काढा, अन्यथा…’; भाजपा महिला मोर्चा आक्रमक


Previous Post

धक्कादायक! मुंबईत मरीन ड्राईव्ह भागात बसण्यासाठी पोलिसाने यूपीआयद्वारे घेतली लाच, ट्वीट जोरात व्हायरल

Next Post

तळेगाव दाभाडेत ‘अरावल्ली टेरेन व्हेईकल चॅम्पियनशिप 2023’ स्पर्धेचे आयोजन, देशभरातील विद्यार्थी सहभागी । ATVC 2023

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ATVC-2023-Pune

तळेगाव दाभाडेत 'अरावल्ली टेरेन व्हेईकल चॅम्पियनशिप 2023' स्पर्धेचे आयोजन, देशभरातील विद्यार्थी सहभागी । ATVC 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
girl-dies-after-drowning

इंदुरी येथे इंद्रायणी नदीपात्रात उडी मारून तरूणीची आत्म’हत्या

February 27, 2026
Strict measures to prevent accidents on highways Strict action against drunk drivers said Transport Minister

महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना ; दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई – परिवहन मंत्री

February 27, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

“वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्रा–बारवर कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करणार”

February 27, 2026
Dilip Dhore unanimously elected as group leader of Panchayat Samiti Maval in NCP meeting

Maval NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पंचायत समिती मावळच्या गटनेतेपदी दिलीप ढोरे यांची एकमताने निवड

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.