व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गहुंजे स्टेडियमवर शुक्रवारी भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामना ; वाहतूक मार्गात मोठे बदल – जाणून घ्या । IND vs ENG 4th T20 Pune Gahunje Stadium

भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये शुक्रवारी (दि.31) पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गहुंजे गावाजवळ असणाऱ्या स्टेडियममध्ये चौथा टी20 सामना होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 30, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, देश-विदेश, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Maharashtra Cricket Association Stadium Gahunje Pune

File Image


Dainik Maval News : भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये शुक्रवारी (दि.31) पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गहुंजे गावाजवळ असणाऱ्या स्टेडियममध्ये चौथा टी20 सामना होणार आहे. या टी20 मालिकेत सध्या टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. गहुंजे येथील स्टेडियमवर होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असून त्यापार्श्वभूमीवर गहुंजे परिसरातील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. ( IND vs ENG 4th T20 Pune Gahunje Stadium )

ज्या वाहनधारकांकडे (व्ही. व्ही.आय.पी/व्ही.आय.पी/इतर अत्यावश्यक सेवा) वाहनाचा पास असेल अशा वाहनांना स्टेडियमकडे जाताना द्रुतगती महामार्गाच्या उजव्या बाजूच्या सेवा मार्गाचा पर्याय देण्यात आला आहे.

मुंबईकडून येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी मार्ग खालील प्रमाणे –
अ) द्रुतगती मार्गाचे देहूरोड एक्झिट मधून डावीकडे वळावे त्यानंतर तात्काळ परत डावीकडे वळून एक्सप्रेस हायवे लगतच्या मामुर्डीगावाचे बाजुस असलेल्या सर्विस रोडने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.
ब) द्रुतगती मार्गावरुन येणारी वाहने किवळे ब्रिज वरून मुकाई चौक येथुन यु टर्न घेऊन कृष्णा चौक मार्ग एक्सप्रेस लगतच्या सिम्बॉयसेस कॉलेजच्या बाजुकडील असलेल्या सर्विस रोडने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.
क) शितलादेवी मंदीर येथुन डाव्या बाजुस वळवून लेखा फार्म मार्गे असलेल्या सर्विस रोडने स्टेडीयमकडे व पाकिंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.
ड) सेंट्रल चौक मार्गे मुकाई चौकात येणारी वाहने किवळे ब्रिज खालून कृष्णा हॉटेल शेजारुन मामुर्डी अंडर-पासचे डाव्या बाजूने अथवा एमएच ०४ बोगद्यातून डावीकडे वळून कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शविलेल्या पार्किंगकडे जातील.
ई) जुन्या मुंबई-पुणे हायवेने येणारी वाहने सेंट्रल चौक येथून यु टर्न घेवून साई नगर फाटा मार्गे पार्किंग ठिकाणी जातील.
मनाई – जुना मुंबई पुणे हायवेने येणारी वाहने सोमाटणे फाटा, सेंट्रल चौक मार्गे बेंगलोर हायवे वरील मामुर्डी जकातनाका जवळील अंडरपास व रस्त्याने येणारे प्रेक्षकाच्या वाहनांना शितलादेवी मंदीर येथून मामुर्डी गावात येण्यास बंदी करण्यात येत आहे.

पुणे बाजुकडून येणा-या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी मार्ग खालील प्रमाणे –
अ) पुणे बंगलोर महामार्गावरुन पवनानदी ब्रिज, हॉटेल सॅन्टोंसा पास करुन किवळे ब्रिज वरुन वाहने डाव्या बाजुकडे वळवाची व २०० मिटर वरुन द्रुतगती मार्गाचे डाव्या बाजुने असलेल्या सर्विस रोडने स्टेडीयमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करतील.
ब) निगडी, हँगिंग ब्रिज कडून येणारे प्रेक्षकांची वाहने रावेत चौक, भोंडवे चौक, मुकाई चौक मार्ग कृष्णा चौक येथुन उजव्या बाजुस वळुन परत एक्सप्रेस हायवे पासून डाव्या बाजुस वळुन असलेल्या सर्विस रोडने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करतील.
क) गहुंजे पुल ते वाय जंक्शन मार्गे स्टेडियमकडे फक्त कार पासधारक वाहनांना तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश देण्यात येईल.

  • मामुर्डी गावातील रूहिड़ा बिर्याणी ते मासुळकर फार्म बाजुकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी. या मार्गावरील वाहने मामुर्डी जकातनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
  • मरीमाता चौक किवळे नाला येथुन मासुळकर फार्म बाजुकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. या मार्गावरील वाहने कृष्णा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
  • सामना संपल्यानंतर मुकाई चौक बसस्टॉप कडुन किवळे अंडरपासमार्गे मुंबई तसेच किवळे बाजुकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांचे वाहतूकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे. या मार्गावरील वाहने मुकाई चौक येथून डावीकडे वळून समीर लॉन्स किवळे गाव मार्गे इच्छित स्थळी जातील.
  • मामुर्डी ते कानेटकर बंगला तसेच मामुर्डी ते गहुंजे स्टेडीयम कडे जाण्या-येण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना ३१ जानेवारी रोजी दुपारी तीन ते रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात येत आहे.
  • कृष्णा चौक ते मामुर्डी अंडरपास मार्गे तसेच जुन्या पुणे मुंबई महामार्गाचे शेजारील मामुर्डी गावचे बाजुस असलेल्या सर्विस रोडने गहुंजे स्टेडीयम कडे जाण्या-येण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना 31 जानेवारी रोजी दुपारी तीन ते रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात येत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळच्या राजकारणात भूकंप ! विधानसभा निवडणुकीत सुनिल शेळकेंविरोधात प्रचार केल्यामुळे राष्ट्रवादीच्या आठ दिग्गज नेत्यांचे पक्षातून निलंबन
– पुणे, शिवाजीनगर, चिंचवड, देहूरोड, तळेगाव, कामशेत व लोणावळा स्थानकांवर थांबणाऱ्या जलद लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी
– वडगावची भूमी केवळ मराठा साम्राज्याचे नव्हे तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक ; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन


dainik maval jahirat

Previous Post

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील विशेष निमंत्रित व नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती रद्द

Next Post

दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत फिरत्या वाहनावरील दुकान, ‘इथे’ करा अर्ज । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Free mobile shop for disabled persons Application Process and Website

दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत फिरत्या वाहनावरील दुकान, 'इथे' करा अर्ज । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.