सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. तसेच आज रविवार 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहतूकीसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. पवना धऱण परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता पोलिसांकडून पवनानगर इथे वाहतूकीत मोठे बदल करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शनिवारपासून ते 1 जानेवारीपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पवनानगर धरण परिसरात बाहेर गावावरून येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे पवनानगर चौक आणि परिसरात वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे, 30 डिसेंबर शनिवारी मध्यरात्री 1 वाजल्यापासून ते 1 जानेवारीपर्यंत पवनानगर (ता.मावळ) येथील रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. ( Traffic changes in Pavana Dam Pavananagar area Maval Taluka )
पवनानगर येथील वाहतूक व्यवस्थेतील नियोजित बदल खालीलप्रमाणे ;
- पुणे-मुंबई-कामशेत बाजूकडून पवनानगर बाजारपेठेकडे येणारी हलकी चार-चाकी वाहने बंद करुन ती येळसे ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे शिवली (विजय आडकर यांचे घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजूकडे) कोथुर्णे-मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राम्हणोलीकडे वारु फाटा, ब्राम्हणोली फाटा मार्ग अशी एकेरी वाहतूक करुन जवन फांगणे, ठाकूरसाई, खडक गेव्हेंडे, जवण-चावसर-मोरवे-तुंग अशी जातील.
2. पुणे-मुंबई-कामशेत बाजूकडून पवनानगर बाजारपेठेकडे येणारी जड-अवजड वाहने पवनानगर मार्गे, जुने रेस्ट हाऊस, केदारी खानावळ चौकातून सात नंबर कॉलनी, पत्राचाळ, ग्रामपंचायत सचिवालय अशी बाह्यवळण मार्गे जातील.
3. दुधीवरे बाजूकडून पवनानगरकडे येणारी जड-अवजड वाहने ही दुधीवरे, पवनानगर बाजार, अशी जातील.
4. तुंग, मोरवे, चावसर, जवन, खडक, गेव्हडे, ठाकूरसाई, फांगणे बाजूकडून पवनानगर बाजारपेठेकडे येणारी हलकी चारचाकी वाहनांची वाहतूक बंद करुन ती एकेरी वाहतूक करुन ब्राम्हणोली फाटा उजवीकडे, वारु फाटा सरळ, मळवंडी, कोथुर्णे फाट्यावरून डावीकडे कोथुर्णे गावातून उजवीकडे, शिवली (विजय आडकर यांचे घरापासून डावीकडे येळसे बाजूकडे) येळसे ग्रामपंचायत फाटा, उजवीकडे कामशेत, मुंबई-पुणे अशी जातील.
अधिक वाचा –
– एकाचवेळी 6 विषारी घोणस सर्पांना जीवदान! शेततळ्यातून सापांना बाहेर काढताना सर्पमित्रांची कसोटी । Raigad News
– मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग! Maval Politics
– महत्वाचा निर्णय! पवना आणि इंद्रायणी नद्या उगमापासून स्वच्छ होणार । Amrit Yojana