चेन्नई-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शुक्रवारी (दि. 12 जानेवारी) घडली. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास लोणावळा स्थानकावर ही घटना घडली. रामजी बालासुब्रमण्यम अय्यर (वय- 58, रा. चेन्नई) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव समजले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शुक्रवारी जेव्हा एकीकडे एक्सप्रेस गाड्यांना लोणावळा स्थानकावर थांबा मिळावा यासाठी आंदोलन सुरु होते, तेव्हाच दुसरीकडे धावत्या रेल्वेतून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीये. अय्यर हे चेन्नईहून मुंबईच्या दिशेने निघाले होते.
हेही वाचा – लोणावळ्यात दिसली सामान्यांची ताकद! विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेल रोको आंदोलन, डेक्कन क्विन रोखल्याने रेल्वे प्रशासनाची धावपळ । Lonavala Railway Movement
लोणावळा स्थानकावर चेन्नई – मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसला थांबा नाही. ही गाडी लोणावळा स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवरून मुंबईच्या दिशेने जात असताना रामजी अय्यर हे रेल्वेतून फलाटावर पडले. यात त्यांना जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाले. जीआरपीचे पोलिस हवालदार अमर सावंत, संदीप पवार यांनी तातडीने त्यांना जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ( train passenger died after falling on platform at lonavala from chennai mumbai superfast express )
अधिक वाचा –
– स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा समितीची कार्यकारिणी जाहीर; 1 मे रोजी होणार विवाह सोहळा । Vadgaon Maval
– खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर! पत्नी रजनीदेवी यांचे निधन । Rajni Devi Passes Away
– PM Kisan योजनेचे पैसे मिळाले नाहीत? योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आजच पूर्ण करा ‘ई-केवायसी’, जाणून घ्या प्रक्रिया