भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी (दिनांक 15 ऑगस्ट) वडगाव नगरपंचायत कार्यालय इथे ध्वजारोहण सोहळा पार पडला. नगरपंचायतचे मुख्याधिकारी आणि सध्याचे प्रशासक डॉ प्रविण निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी देशात राबवण्यात येत असलेले ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अभियानांतर्गत भारतभूमीतील माती विषयी जनजागृती, प्रेम व साक्षरता निर्माण व्हावी, तसेच मातृभूमीसाठी झटणारे आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा याप्रती वडगाव नगरपंचायत वतीने वीरांना मानवंदना देणारे स्मारक फलक लावण्यात आले. या शूरवीरांना मानवंदना देऊन अभिवादन करत माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी वडगावकर नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ( Tricolor Rally on Independence Day Procession of Freedom Fighters Amid Drums Vadgaon Maval )
हर घर तिरंगा हि मोहिमही मोठ्या उत्साहात साजरी होत असताना वडगाव नगरपंचायत वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करून शहरातील आजी माजी स्वातंत्र्यसैनिकांचा ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत सन्मान केला. याप्रसंगी आमदार सुनिल शेळके, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम वडगाव शहरातील सर्वपक्षीय आजी माजी पदाधिकारी, सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते, पत्रकार बांधव, नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि वडगाव शहरातील शिक्षक, विद्यार्थी, नागरिक आणि मोरया महिला प्रतिष्ठानच्या पदाधिकारी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त वडगाव नगरपंचायत वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत आमच्या मोरया ढोल पथकाने उत्कृष्ट वादन सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अडीच हजार महिला भगिनींच्या उपस्थितीत वडगावमध्ये श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण; हळदी-कुंकू समारंभाने कार्यक्रमाची सांगता
– मावळ तालुक्यातील इंदोरी आणि सुदुंबरे येथील 284 आदिवासी ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप
– आ-चंद्रसुर्य नांदो…स्वातंत्र्य भारताचे! वडगाव मावळ इथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण, ‘या’ कुटुंबाचा केला सन्मान