देशाच्या राजकारणातून एक अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना आणि पक्षाच्या असंख्य नेते, कार्यकर्त्यांसाठी हा मोठा धक्का आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 10 जानेवारी 2000 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. मात्र 2014 नंतर देशभरातील अनेक राज्यांतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिछेहाट होताना दिसली. अखेरीस आज (सोमवार, दिनांक 10 एप्रिल 2023) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले. ( Trinamool Congress CPI Nationalist Congress Party loses national party tag said Election Commission Of India grants national party status to Aam Aadmi Party )
Nationalist Congress Party loses national party tag: EC
— Press Trust of India (@PTI_News) April 10, 2023
या पक्षांनीही गमावला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह अन्य पक्षांचा देखील राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला आहे. यात तृणमुल काँग्रेस, सीपीआय या दोन्ही पक्षांचा देखील दर्जा काढून घेतला आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष देखील आता प्रादेशिक पक्ष असणार आहे.
Election Commission grants national party status to Aam Aadmi Party
— Press Trust of India (@PTI_News) April 10, 2023
आप बनला राष्ट्रीय पक्ष
मागील काही महिन्यांपासून अनेक राज्यांतील निवडणूकांत अभूतपूर्व यश संपादिक करणाऱ्या आम आदमी पार्टी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकवण्यासाठी पक्षांना पाळावे लागणारे निकष;
- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ६ टक्के मतं, चार किंवा अधिक राज्यांमध्ये मिळवली पाहिजेत.
- लोकसभा निवडणुकीत 4 जागांवर त्या पक्षाला कोणत्याही राज्यात विजय मिळवता आला पाहिजे.
- लोकसभा निवडणुकीत 2 टक्के जागांवर विजय मिळवता आला पाहिजे आणि ते विजयी उमेदवार तीन वेगवेगळ्या राज्यातून विजयी झालेले असणं आवश्यक आहे.
- चार राज्यांमध्ये संबंधित पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा असणं आवश्यक आहे.
अधिक वाचा –
– अवकाळीचा कहर..! गारपीट अन् वादळी वाऱ्यामुळे आंदर मावळ भागातील बागायतदार, फुलउत्पादक शेतकरी संकटात
– टाटा डॅममध्ये बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अखेर यंत्रणांना यश