मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात नवीन अमृतांजन पुलाजवळ मंगळवारी (16 नोव्हेंबर) रोजी भीषण अपघात झाला. एक भरधाव टेम्पो उलटल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. ( Truck Accident on Mumbai Pune Expressway )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बोरघाट महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो चालकाचे अमृतांजन पुलाजवळ तीव्र उतार आणि वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर सदर टेम्पो (केए 20 डी 4674) हा नवीन अमृतांजन पुलाजवळ उलटला. या भीषण धडकेत टेम्पोचा अक्षरशः चुराडा झाला. तर टेम्पो चालकाचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. तीव्र उतारावर गाडीचे ब्रेक्स निकामी झाल्याने सदर अपघात घडला असावा अशी शक्यता महामार्ग पोलिसांनी व्यक्त केली.
अधिक वाचा –
– देव तारी त्याला कोण मारी! एका ड्रायव्हरच्या समयसुचकतेमुळे वाचला दुसऱ्या ड्रायव्हरचा जीव, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील घटना
– 75 बाईकर्स, 75 दिवस आणि 34 राज्ये, काय आहे फ्रिडम रायडर बाईक रॅली? जाणून घ्या सविस्तर