मावळ तालुक्याला ( Maval ) बुधवारी (दि. 10 जानेवारी) अवकाळी पावसाने ( Unseasonal Rain ) झोडपले. वडगाव मावळ परिसरात दुपारी 1 वाजल्यापासून तास-अर्धातास मुसळधार पाऊस झाला. ऐन हिवाळ्यात पावसाळ्यात पडावा असावा पाऊस कोसळल्याने सामान्यांची चांगलीच तारंबळ उडाली होती. मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी अवकाळी सरी बरसल्या. लोणावळा शहरात मंगळवार आणि बुधवार अशा सलग दोन दिवस अवकाळी पावसाचे दर्शन झाले. ह्या पावसाने थंडीचा कडाका वाढण्याची चिन्हे दिसत आहे. तर दुसरीकडे जोरदार पावसाने बागायतदार शेतकरी चिंचेत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
देशासह राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. पुढील 48 तासात राज्यासही देशातील अनेक भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज (दि. 10) अनेक भागात सकाळपासूनच अवकाळी पाऊस झाला. पुणे, बारामती, सातारा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या परिसरात पाऊस झाला. तर काही भागात ढगाळ वातावरण असून तिथेही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जानेवारीत पडत असलेल्या या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ( Unseasonal rain in Maval Taluka Pune News Rain Update )
अधिक वाचा –
– Breaking! कामशेतजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने अनोळखी वाटसरूचा मृत्यू । Kamshet Accident
– आनंदाची बातमी! स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत लोणावळा नगरपरिषदेची सर्वोच्च कामगिरी, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव । Lonavala
– मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा जेसीबी जळून खाक, जबाबदार कोण? । Talegaon Dabhade