वडगाव शहरातील सततची होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि बससेवा सुरळीत करण्यासाठी वडगाव नगरपंचायत प्रशासनाने मुख्य रस्त्यालगत असणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्या संदर्भात शहरात वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या स्थानिक टपरी आणि पथारी धारकांनी शुक्रवारी (दि. 28 जून) रूपेश म्हाळसकर यांच्या पुढाकारातून वडगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांची भेट घेतली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी मुख्याधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेतून व त्यांच्या सहकार्याच्या भावनेतून वडगावकर सुज्ञ नागरिक म्हणून सर्व पथारीधारकांनी सामंजस्याची भूमिका घेत, आपल्यामुळे रहदारीस कोणतीही बाधा निर्माण होऊ नये म्हणून स्वतःहून रस्त्यात येणारे अडथळे दूर करून प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका घेतली. तसेच प्रशासनाने लवकरात लवकर टपरी धारकांना पर्यायी अधिकृत जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी सर्व पथारी धारक व टपरी मालकांनी केली. ( Vadgaon Maval city traffic jam Problem action by Nagar Panchayat administration )
अधिक वाचा –
– प्रशासनाच्या बोगस कारभाराविरोधात करूंज गावातील नागरिकांचे आमरण उपोषण !
– देहूतील इनामदार वाड्यातील मुक्काम संपवून तुकोबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ ! आज आकुर्डीत मुक्काम । Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla
– वडगावातील श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान । Vadgaon Maval