वडगाव मावळ : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त वडगाव शहर माजी उपनगराध्यक्ष सायली रुपेश म्हाळसकर यांच्या वतीने शहरातील महिलांसाठी नवरात्रमध्ये नऊ-दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करून दररोज एक सेल्फी व रील्स पाठवणाऱ्या स्पर्धकांसाठी मी दुर्गा बेस्ट सेल्फी अँड रिल्स कॉन्टेस्ट-2023 स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा शनिवारी, दिनांक २८ ऑक्टोबरला श्री पोटोबा मंदिर प्रांगणात पार पडला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नऊ दिवस असलेल्या या स्पर्धेत एकूण-150 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये वैष्णवी तांबे, वैशाली शिंदे, माधुरी पचपांडे, ज्योती भवारी, दिपाली मोरे, किरण ढेरे, वर्षां सोमाणी, निकिता मुथा, निकाता वानखेडे यांनी बेस्ट सेल्फी ऑफ डे म्हणून नऊ दिवसातील नऊ दुर्गा बाण्याचा मान मिळवला. तर बेस्ट रील्स म्हणून अक्षदा शिंदे प्रथम, पुनम गायकवाड द्वितीय, तर ममता दौंडे यांनी तृतीय क्रमांकाचा मान मिळविला. तसेच नवदुर्गांपैकी भाग्यशाली महादुर्गा विजेत्या-2023 म्हणून निकिता वानखेडे यांची निवड झाली.
यावेळी वानखेडे यांना सोन्याची नथ, फ्रीज, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व आकर्षक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे नऊ दिवसातील नऊ दुर्गा ठरलेल्या विजेत्यांस सोन्याची नथ, भेटवस्तू, ट्रॉफी, प्रमाणपत्र, गुलाब पुष्प व फेटा घालून सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ म्हणून 18 स्पर्धकांना विविध बक्षीसे देण्यात आली. ( Vadgaon Maval MNS Lucky Navdurga 2023 Competition )
या प्रसंगी सुषमा तोरस्कर, अश्विनी तुमकर, सुनिता तुमकर, रेणुका दंडेल, पुष्पा सुराणा, सोनाली मोरे, आरती राऊत, आदिती सुळे, अनिता भसे, राजश्री तांबोळी, गीता मोरे, काजल ढोरे, नसीम शेख, स्वाती पाटोळे, सीमा ओव्हाळ, स्नेहा कर्णवट, मालती घारे, अनिता राऊत, पूजा पिंगळे, रेबिका चव्हाण, ज्योती कदम, विदुला भिडे, योगिता बाफना, मनिषा दरेकर, माधवी बोरावके, विनया कडू,अनुपमा आरगे, श्रेया भंडारी, बेबी कडू, सुरेखा खांडभोर, अनिता बाफना, मंदाकिनी वाघमारे, सुनिता जाधव, वैशाली लचके, प्रिया लवंगारे, रेखा भोसले, अश्विनी भोसले, मनिषा ढोरे,सुवर्णा उडापे आधी मान्यवर उपस्थित होते.
या बक्षीस वितरणाचे संयोजन वडगाव मनसेच्या शहराध्यक्ष अर्चना ढोरे, अश्विनी म्हाळसकर, वर्षा म्हाळसकर, सुषमा म्हाळसकर, प्रतीक्षा शिंदे, सोनल कराळे, शीतल म्हाळसकर, सानिया शेख, सीमा वावरे, साक्षी म्हाळसकर, जागृती म्हाळसकर, रेणुका म्हाळसकर, सुवर्णा म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर, आदी महिलांनी केले.
अधिक वाचा –
– आर्थिक सक्षमीकरणासाठी पवन मावळातील महिला बचत गटांना मदतीचा हात!
– पिंपरी-चिंचवड शहरात भव्य राजमाता जिजाऊ महिला संमेलन; संपूर्ण पुणे विभागातून महिला होणार सहभागी
– शब्दांजली..! “वारकरी कीर्तन परंपरेतील महान कीर्तनकार – बाबा महाराज सातारकर”