काही दिवसांपूर्वी वडगाव शहराच्या उपनगराध्यक्ष पदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सायली रुपेश म्हाळसकर यांची बिनविरोध निवड पार पडली होती. सायली म्हाळसकर यांच्या रुपाने मावळात पहिल्यांदाच मनसेचा उपनगराध्यक्ष बनला. त्यामुळे आज (गुरुवार, 9 मार्च) रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सायली म्हाळसकर यांचा ठाण्यात खास सत्कार केला. ( Vadgaon Maval Nagar Panchayat Deputy Mayor Sayli Mhalaskar Felicitated By MNS President Raj Thackeray In Thane Video )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ठाण्यात आज मनसेच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त गडकरी रंगायतन इथे खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे अर्थातच राज ठाकरे हेच होते. यावेळी हजारो मनसैनिकांच्या उपस्थितीत राज ठाकरेंनी सायली म्हाळसकर यांचा व्यासपीठावर विशेष सत्कार केला. विशेष म्हणजे यावेळी राज ठाकरेंनी म्हाळसकर यांच्याशी हितगुज करताना खास संवाद देखील साधला. हा संपूर्ण प्रसंग उभ्या महाराष्ट्राने लाईव्ह पाहिला.
मावळ तालुक्यात पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा उपनगराध्यक्ष बनला आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदासाठी शुक्रवारी (3 मार्च) पार पडलेल्या निवड प्रक्रियेत मनसेच्या सायली रूपेश म्हाळसकर यांची बिनविरोध निवड झाली. वडगाव नगरपंचायतमध्ये मागील साडेचार वर्ष मनसे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेत सहभागी आहे. त्यानुसार राष्ट्रवादीने ठरल्याप्रमाणे मनसेला उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली.
अधिक वाचा –
– मावळात मनसेचा डंका! वडगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदी सायली म्हाळसकर बिनविरोध
– महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर कार्यकारिणी जाहीर, रुपेश म्हाळसकरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान, पाहा संपूर्ण यादी