Dainik Maval News : वडगाव नगर पंचायतीची वर्ष सन 2024-25 या वर्षातील घरपट्टी कराची चालू व थकीत एकूण मागणी 9 कोटी तसेच पाणीपट्टीची चालू व थकीत एकूण मागणी 1 कोटी 46 लाख अशी दोन्ही मिळून एकूण मागणी 10 कोटी 46 लाख एवढी असून 31 मार्च 2025 अखेरीस नगरपंचायतीची एकुण वसुली 6 कोटी 15 लाख इतकी झाली असून एकूण 58 टक्के वसुली झाली आहे.
वडगाव शहरात लहान, मोठे असे मिळून अंदाजे 100 अपार्टमेंट असून काही अपार्टमेंट मधील सदनिकामध्ये कोणीही राहत नसल्यामुळे कर वसुली करणे शक्य होत नाही. परंतु आता ज्या सदनिकांची वर्षानुवर्षे थकबाकी आहे, त्या सदनिकांना जप्तीपूर्वीच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत व त्यांना तीन दिवसात कर भरुन घेण्याची मुदत देण्यात येत आहे. जर तीन दिवसात सदनिका धारकांनी कर भरला नाही तर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 152 ते 156 नुसार मालमत्ता जप्त करण्यात येईल व लिलावाद्वारे विकुन कर जमा करुन घेण्यात येईल.
- वडगाव नगरपंचायतीची चतुर्थ वार्षिक कर आकारणी करण्यापूर्वी वडगाव शहरातील ७८०० मिळकतींची नोंद होती व कराची चालू मागणी 3.20 कोटी होती. कर आकारणी पूर्ण झाल्यावर 12562 इतक्या मिळकतींचा सर्व्हे झाला व चालु कराची मागणी 5.63 कोटी एवढी वाढली. त्यामध्ये थकबाकी मिळुन सन 2024-25 वर्षाची एकुण 10.46 कोटी एवढी कराची मागणी झाली होती. मार्च महिन्यात कर वसुलीसाठी एकुण 5 पथके तयार केली होती. त्यामध्ये घरोघरी जाऊन कर भरण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्यात आले. सुमारे 127 नळ कनेक्शन कट करण्यात आले व ज्या मिळकतींची थकबाकी वर्षानुवर्ष होती अशा मिळकतींना सुमारे 47 जप्तीपुर्वीच्या नोटिस देण्यात आल्या होत्या.
डॉ. प्रविण निकम, मुख्याधिकारी तथा प्रशासक, वडगाव नगर पंचायत यांनी आवाहन केले आहे की, सदरील सदनिका धारकांनी लवकरात लवकर कर भरावा व कारवाई टाळावी तसेच अशा मालमत्ता धारकांना वडगांव नगरपंचायतीकडुन कोणतीही सेवा अथवा दाखले देण्यात येणार नाही. जप्तीपुर्वीच्या नोटीस दिल्यावर जर कर भरला नाही अशा सदनिकावर कारवाई करण्यात येणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates