तळेगाव दाभाडे येथील बलुतेदार महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वैष्णवी टकले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे शहर भाजपा संघटनमंत्री सचिन टकले यांच्या त्या पत्नी आहेत. ( Vaishnavi Takle Elected As President Of Balutedar Mahila Nagari Sahakari Patsanstha of Talegaon Dabhade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वैष्णवी टकले यांचा तळेगांव दाभाडे शहर भाजपा कामगार मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी तळेगाव दाभाडे शहर भाजपा कामगार मोर्चाचे अध्यक्ष अशोक दाभाडे, कार्याध्यक्ष स्वप्निल भेगडे, सरचिटणीस आनंद पुर्णपात्रे, अतिश रावळे, उपाध्यक्ष सतिश पारगे, अनिल शेलार, टकले परिवारातील सदस्य उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात ‘जंगलराज’ची झलक! शिवली गावात रस्त्याच्या वादातून तुंबळ हाणामारी, वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल
– वडगाव शहरात महाआरोग्य शिबिर संपन्न, हजारो रुग्णांनी घेतला मोफत औषधोपचाराचा लाभ