वेहेरगाव-दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या (ता. मावळ) सरपंचपदी वर्षा संतोष मावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलावून निवडणूक प्रक्रिया पार पडली. सरपंचपदासाठी निर्धारित वेळेत वर्षा मावकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कार्ला मंडल अधिकारी आशा धायगुडे, ग्रामसेवक गणेश आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजू देवकर, शंकर बोरकर, अनिल गायकवाड, काजल पडवळ, पूजा पडवळ, योगिता पडवळ, सुनील येवले आदी उपस्थित होते. मावकर यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. ( Varsha Mavkar Elected unopposed Sarpanch of Vehergaon Dahivali Group Gram Panchayat Maval )
माजी अध्यक्ष भाऊसाहेब मावकर, माजी सरपंच सचिन येवले, गणपत पडवळ, चंद्रकांत देवकर, राष्ट्रवादी उपाध्यक्ष तानाजी पडवळ, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर पडवळ, पांडुरंग मावकर, विष्णू मावकर, शांताराम मावकर, किरण येवले, अशोक पडवळ, मोरेश्वर पडवळ, नवनाथ पडवळ, रामचंद्र येवले, गणेश मावकर, संतोष मावकर, शाम गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. वेहरगाव दहिवली ग्रामस्थांनी मावकर यांचा निवडीबद्दल सन्मान केला.
अधिक वाचा –
– गोरगरिबांना दिलासा! जन्म-मृत्यू नोंदीसाठीची फरफट थांबणार, आता तहसीलदारांना मिळालेत जन्म मृत्यू नोंदीचे अधिकार
– वडगावमध्ये मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला वर्गासाठी दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण शिबिर । Vadgaon Maval
– “राम बहुजनांचा आहे..राम शिकार करुन मांसाहार करत होता..देशातील 80 टक्के मांसाहारी रामभक्त आहेत”